सांस्कृतिक

डॉ. दीपा देवळेकर आणि अंजुम इनामदार यांना रुग्ण हक्क परिषदेचा महात्मा गांधी सेवा पुरस्कार प्रदान*

महात्मा फुले वाड्यावर एका महात्म्याच्या पायाशी बसून दुसऱ्या महात्म्यास अभिवादन!*


अफरोझ अत्तार याजकडुन:-

*(महात्मा गांधी सेवा पुरस्कार – २०२० प्रदान करताना डावीकडून प्राचार्य वृंदा हजारे, उमेश चव्हाण, अंजुम इनामदार, डॉ. दीपा देवळेकर, डॉ. अमोल देवळेकर.)

डॉ. दीपा देवळेकर आणि अंजुम इनामदार यांना रुग्ण हक्क परिषदेचा महात्मा गांधी सेवा पुरस्कार प्रदान*

*महात्मा फुले वाड्यावर एका महात्म्याच्या पायाशी बसून दुसऱ्या महात्म्यास अभिवादन!*

*पुणे -* सद्यपरिस्थित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजी यांची १५१ वी जयंती रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी होप मेडिकल हॉस्पिटलच्या विश्वस्त प्रसिद्ध डॉ. दीपा देवळेकर आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांना महात्मा गांधी सेवा पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आला.
यावेळी मंचावर रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, ज्येष्ठ गांधीवादी नेते सुभाष वारे, डॉ. अमोल देवळेकर, प्राचार्य वृंदा हजारे उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या तैलचित्रास उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी उमेश चव्हाण म्हणाले की, गांधीजींची सत्य, अहिंसा, परमो:धर्म या तत्वांचा अंगीकार केला, तर महिला सुरक्षित राहतील. हिंसा घडणार नाही. जातीच्या चौकटीत बांधला न गेलेला एकमेव महापुरुष म्हणून, केवळ भारतीय म्हणून त्यांची ओळख जगात ठरते.
सुभाष वारे म्हणाले की, गांधींजीच्या एकूण आयुष्यात रुग्णसेवेला फार महत्व होते. देशातील अनेक आश्रमात रुग्णसेवा केली जात असे. लोक सेवा, रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या डॉ. दीपा देवळेकर आणि अंजुम इनामदार यांच्या कार्याला आज पुरस्कारामुळे पावती मिळाली आहे. गांधीजींच्या नावाने गांधीजयंतीदिनी पुरस्कार देण्याची संकल्पना प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन विजय गायकवाड, अपर्णा साठे, सुनील रॉय, गिरीश घाग यांनी केले. दिव्या कोंतम यांनी सूत्रसंचालन केले तर विकास साठे यांनी आभार मानले.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close