आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व आमदारांचा पाठिंबा, पाठिंब्याचे दिले निवेदन

मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने मराठा समाज पुन्हा एकवटला

मराठा आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व आमदारांचा पाठिंबा, पाठिंब्याचे दिले निवेदन

खालापूर – समाधान दिसले

मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने मराठा समाज पुन्हा एकवटला असल्याने नुकताच शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आले होते. तर पुन्हा हीच लढाई मराठा समाजाने पुढे सुरू ठेवली असून 2 अॉक्टोबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने रायगड जिल्हा सर्व आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आल्याने यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवा असे पाठिंबा पत्र दिले आहे.

आरक्षणासाठी मराठा समाजानी अनेक वर्षापासून आंदोलनाचा आपल्या हक्कासाठी धङाका लावला आहे. 2018 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र भर क्रांतीदिनी झालेल्या आंदोलनानंतर तत्कालीन सरकारला आरक्षणावर शिक्कामोर्तब करावे लागले होते. परंतु नुकतीच सुप्रीम कोर्टानी आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्यातच राज्य सरकारने पोलिस भरतीची घोषणा करुन मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. संतापलेला मराठा समाजाकङून रायगड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय समोर 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात होते, तर या आंदोलनाने मराठा समाज गप्प न राहता 2 अॉक्टोंबर रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आल्याने पालकमंत्री तथा आमदार आदीतीताई तटकरे, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, पेणचे आमदार रवि पाटील, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, शिक्षक मतदारसंघ आमदार, बाळाराम पाटील, विधानपरिषद आमदार जयंत पाटील, अनिकेत तटकरे या आमदारांनी मराठा समाजाला पाठिंबा देत त्या आशयाचे पाठिंबा पत्र मराठा समाज बांधवाना दिले असून यावेळी राज्य समन्वयक विनोद साबळे, राज्य समन्वयक रायगड जिल्हा सुनिल पाटील, गणेश कडू, रामदास शेवाळे, अनिल भोसले, मंगेश दळवी, रुपेश कदम, उल्हास पवार, नरेश सावंत, प्रदीप देशमुख याप्रमुखासह जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close