क्राईममहाराष्ट्र

उत्तरप्रदेशातील तरूणीवरील सामुहिक अत्याचारा विरोधात खोपोलीत शांतता कँडल मार्च

गुन्हेगारांना फाशीची नव्हे तर भर चौकात जाळ्चीण्याची केली मागणी

  1. खालापूर – समाधान दिसले

उत्तरप्रदेशातील तरूणीवरील सामुहिक अत्याचारा विरोधात खोपोलीत शांतता कँडल मार्च

गुन्हेगारांना फाशीची नव्हे तर भर चौकात जाळण्याची केली मागणी

  1. उत्तरप्रदेशातील हथरस येथील एकोणीस वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार करीत हत्या केल्याच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभा, संतोष नवतरुण मित्र मंडळ, माता रमाई महिला मंडळ आणि महिला बचतगट यांच्या संयुक्त विद्यामानाने वासरंग गावात ग्रामस्थांनी शांतता कँडल मार्च काढत गुन्हेगारांना फाशीची नव्हे तर भर चौकात जाळून शिक्षा द्यावी या मागणी करीत केंद्रा सरकार आणि युपीसरकारचे निषेध केले आहे.
    वासरंग येथे आयोजित शांतता कँडल मार्च मध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखा वासरंगचे खजिनदार व नवतरूण  चेतन सिद्धार्थ कांबळे यांनी केले. मोर्चामध्ये महासचिव आनंद सोनावणे, अशोक जाधव,शनितीन मोहिते, आनंता काकडे, बोरसे साहेब, ययाती शिरसाळे, रामचंद्र शिंदे सर्व महिला उपस्थित होत्या.शामनिषा नावाच्या तरूणीवर चार नराधमांनी अमानुष सामुहिक अत्याचार करीत कोणताही पुरावा शिल्लक राहू नये यासाठी तिची जीभ छाटून हात आणि पाय तोडले असता मृत झाली असे समजून सोडून दिले होते. मात्र सुदैवाने ती जिवंत होती. तब्बल चौदा मृत्यूंशी झुंजत होती तीन दिवस आधी मनिषाने अखेरचा श्वास घेतला असता तिचा मृतदेह कुटूंबियांना स्वाधिन न करता अंत्यविधीसाठी परस्पर अंतीमसंस्कार केले असून नक्की उत्तरप्रदेश सरकार काय लपवतोय तसेच त्या नराधमांना का पाठीशी घालतोय असे असताना मात्र उत्तरप्रदेश सरकार मूग गिळून गप्प बसले आहेत याविरोधात महासचिव आनंद सोनावणे यांनी संताप व्यक्त केले. आरोपींना फक्त फाशी न देता त्यांना भर चौकात जाळा असे सांगत घराघरात मुलीला जिजाऊ, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे शिक्षण देवून सशक्त महिला तयार करणे गरजेचे असल्याचे चेतन कांबळे यांनी सांगितले
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close