क्राईम

भारतीय बाल्मीकि समाजातर्फे* *दलित मुलीवर* *झालेल्या अत्याचाराबद्दल निवेदन* भारती धिगान प्रतिनिधी नाशिक रोड

k*भारतीय बाल्मीकि समाजातर्फे* *दलित मुलीवर* *झालेल्या अत्याचाराबद्दल निवेदन* 

भारती धिगान प्रतिनिधी नाशिक रोड

नाशिक येथील विभागीय आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आले.उत्तर प्रदेश येथील हाथरस मध्ये एका दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या यूपी सरकार प्रशासनाच्या कृत्याची चौकशी करून बरखास्त करण्याबाबतचे पत्र भारतीय वाल्मिकी समाज नाशिक (महाराष्ट्र राज्य)यांचेकडून माननीय मुख्यमंत्री जी उद्धवजी ठाकरे (महाराष्ट्र राज्य)माननीय श्री बबनजी घोलप समाज कल्याण मंत्री (महाराष्ट्र राज्य)तसेच विभागीय आयुक्त साहेब नाशिक रोड कार्यालयात देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय (मनीषा वाल्मिकी) या तरुणीवर त्याच गावातील ठाकूर आणि राजपूत या उच्च जातीच्या तरुणांनी सामूहिक बलात्कार करून अमानुष कृत्य केले. तद्नंतर काल तिचे प्रेत घरच्यांना न देता यूपी पोलिसांनी परस्पर तिच्यावर अंतिम संस्कार केले. घरच्यांच्या विनवणी करूनही हा अमानुष प्रकार करण्यात आला. रात्री तीनच्या सुमारास पोलिसांनी तिचे शव परस्पर जाळून दिले. हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा असून संबंधित बेजबाबदार पोलिसांची चौकशी करून उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्यात यावा व बलात्कारी तरुणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.असे निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय बाल्मीकि समाज नाशिक (महाराष्ट्र राज्य)चे सुनील मेहरोलिया,राणा पारचा,संजय खरालिया, सोनू बेहनवाल, विशाल हाडा, नितीन जगताप, चेतन बिगानिया, विक्रम डुलगज, यांच्या निवेदनावर सही आहेत. या वेळी समाजातील स्त्री-पुरुष उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close