आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडी

वनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*

 

*म.वनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांना ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित*

सन २०२०-२१ या वर्षात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या केंद्राचा प्रजापिता ब्रम्हाकुमारी यांचे मुख्यालय असणा-या माऊंट अबु राजस्थान येथिल केंद्राचे प्रजापती ब्रम्हकुमारी येवला या केंद्राचा वृक्षमित्र’ मानचिन्ह देवुन गौरव

गावांमध्ये २००० पेक्षा जास्त वृक्षारोपन

येवला – प्रजापिती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येवला सेवा केंद्रात आयोजीत कार्यकमातः म.वनपरिक्षेत्र अधिकारी येवला (प्रा.) श्री. संजय नारायण भंडारी यांना पक्षी संवर्धन, मानव बिबट्या संघर्ष, वन संवर्धन व वृक्ष संवर्धन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शनासाठी बोलविण्यात आले होते. सदर कार्यक्रमात म.वनपरिक्षेत्र अधिकारी येवला (प्रा.) यांनी येवला. निफाड, चांदवड व सिन्नर या त्यांच्या कार्यक्षेत्रात दैनदिनी येणारे अनुभव कथन केले. तसेच सध्याच्या परिस्थितीत मानवाला निसर्गात उपलब्ध असलेल्या प्राण वायूचे महत्व समजावून सांगितले. निफाड तालुक्यात होणा-या मानव बिबट्या संघर्षावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रजापिता ब्रम्हाकुमारी येवला या केंद्राने मागील तीन वर्षामध्ये येवला तालुक्यात गावोगावी जावुन वृक्ष संवर्धनाचे महत्व सांगितले आहे व गावांमध्ये २००० पेक्षा जास्त वृक्षारोपन केलेले आहे. सन २०२०-२१ या वर्षात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या केंद्राचा प्रजापिता ब्रम्हाकुमारी यांचे मुख्यालय असणा-या माऊंट अबु राजस्थान येथिल केंद्राचे प्रजापती ब्रम्हकुमारी येवला या केंद्राचा वृक्षमित्र’ मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आलेला आहे..वनपरिक्षेत्र अधिकारी येवला (प्रा.) श्री. संजय नारायण भंडारी यांना पर्यावरण संवर्धन, मानव बिबट्या संघर्ष व वृक्ष संवर्धनामध्ये येवला, निफाड, चांदवड़ व सिन्नर या तालुक्यात उत्कृष्ट कार्य केल्याने प्रजापिता ब्रम्हाकुमारी येवला केंद्रांने म.वनपरिक्षेत्र अधिकारी येवला (प्रा.) श्री. संजय नारायण भंडारी यांना वृक्षमित्र’ मानचिन्ह देवुन गोरव करण्यात आलेला आहे.सदर कार्यक्रमास म.बनपरिक्षेत्र अधिकारी येवला (प्रा.) श्री. संजय नारायण भंडारी, प्रजापिता ब्रम्हाकुमारी येवला केंद्राच्या संचालक ब्रह्मकुमारी निता दिदी, ब्रम्हकुमारी अनुदिदि संचालिका श्री.एम.बी.पवार वनपाल राजापूर, श्री.पी.एस.पाटील वनरक्षक येवला, श्री.जी. आर.हरगावकर वनरक्षक राजापुर,श्री विलास देशमुख वाहणचालक व केद्रातील अनुयायी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close