महाराष्ट्र

आमीन भाई युवा मंच तर्फे युपी हाथरस सामुदाहीक बलत्कार प्रकरणी निषेध निवेदन, आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी,* *पोलीस टाईम प्रतिनिधी. आफरोज आत्तार*

पोलिसांनी परस्पर तिच्यावर अंतिम संस्कार केले

*आमीन भाई युवा मंच तर्फे युपी हाथरस सामुदाहीक बलत्कार प्रकरणी निषेध निवेदन, आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी,*

*पोलीस टाईम प्रतिनिधी. आफरोज आत्तार*

. मनमाड ./उत्तर प्रदेशातील हाथरस पैभील 19 वर्षीय बाल्मिकी समाजातील तरुणीवर, त्याच गावातील ठाकूर आणि

राजपूत या उच्च जातीच्या तरुणांनी सामूहिक बलात्कार करून तिने आरोपीचे नाव सांगण्याची हिंगत करू नये म्हणून तिथी जीभ देखील कापून काढली. तिच्यासोबत झालेल्या या भयावाह क. अमानुष बलात्कारामुळे आणि तिला वैद्यकीय उपचार मिळण्यास झालेल्या अडथळ्या मुळे काल तिचा मृत्यू झाला. काल तिो प्रेत घरच्यांना सुपूर्द न करता पोलिसांनी परस्पर तिच्यावर अंतिम संस्कार केले. अंतिम संस्कार च्या पूर्वी घर्यांनी दिनवणी करूनही तिचे दर्शन घेऊ दिले नाही आणि अंतिम संस्काराच्या वेळी घरच्यांना व प्रेसला अधारात ठेवण्यात आले.

सुरुवातीला आरोपीच्या विरोधात FIR करण्यात देखील पोलिस टाळाटाळ करत होते. या टाळाटाळी बद्दल सरकार विरोधात आवाज उठल्या नंतर FIR घ्यावा लागला. ही घटना उत्तरप्रदेशातील योगी सरकार आणि पोलीस दाबण्याचा प्रयत्न करीत होते आणि आहेत.

या तरुणीला वेळेवर वैद्यकीय मदत देखील मिळाली नाही अन्यथा तिचा जीव वाचू शकला असता, क्रूर अमानुष अत्याचाराची ही पटना आणि त्यानंतर संपूर्ण शासन व्यवस्थेने तिला मदत देण्यासाठी केलेले असहकार्य आपल्या संपूर्ण रामाजाला आणि भारतीय राज्य व्यवस्थेला लज्जास्पद अशी पटना आहे.

या शर्मनाक घटनेचा आमध्या तर्फे तीव्र निषेध करते. मनुस्मृतीच्या व्यवस्थेचा पगडा भारतीय समाजातील उच्चवर्णियांवर आजही कायम आहे त्या मुळे महिला आणि शूद्रातिशूद्राच्या वरील अत्याचार वाढत चालले आहेत. परंतू मनुस्मृतीच्या व्यवस्थेला नकार देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला समतेचे अधिकार देणारे संविधान दिलेले आहे आणि नागरिकांच्या या समतेच्या अधिकार चि रक्षण करण्याची जबाबदारी राज्य व्यवस्थेला दिलेली आहे ही संवैधानिक अबाबदारी पार पाडण्यास नकार देऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार व पोलिस संविधानाची सातत्याने द्रोह करत आहे.व मनुस्मृती ची व्यवस्था राबवत आहे. तरी या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता आमीन भाई मित्र मंडळ यांच्यातर्फे सर्कल अधिकारी चौधरीसाहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी मा,नगरसेवक आमिन पटेल,राजू भैय्या पवार ,सूनील भैय्या मायर,शरद भाई बहोत,संजू भाई चावरिया,मटरु भाई चुनियान,फिरोज भाई शैख,सद्दाम अत्तार,,जमिल सय्यद,इम्तियाज़ अत्तार,राजीव तुकाराम पगारे,सोहल पटेल,मोनु पटेल,सनी फसाटे ,आकाश सिरसाट,जाफर पाठाण,पापा पठान,आवेश शैक,आनंदा बारसे,व मित्र परिवार उपस्तित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close