क्राईम

मनमाड वंचित बहुजन आघाडी तर्फे हाथरस येते वाल्मिकी समाजाच्या निरागस मुलीवर झालेला अमानुष बलात्कार व हत्येचा जाहीर निषेध* *पोलिस टाईम्स प्रतिनिधी. अफरोज आतार*

गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा करावी अशी मागणी अन्यथा वंचित बहुजन आघाडी मनमाड शहराच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

*मनमाड वंचित बहुजन आघाडी तर्फे हाथरस येते वाल्मिकी समाजाच्या निरागस मुलीवर झालेला अमानुष बलात्कार व हत्येचा जाहीर निषेध*

*पोलिस टाईम्स प्रतिनिधी. अफरोज आतार*

वंचित बहुजन आघाडी मनमाड , दि.१४/०९/२०२० रोजी हाथरस, राज्य- उत्तर प्रदेश येथे एका १९ वर्षीय (मनीषा वाल्मिकी) या पिडीतेवर सामुहिक बलात्कार झाला होता. यात पिडीतेची जीभ कापली तसेच मणक्याचे हाड देखील मोडण्यात आले आहे. बलात्काराच्या घटने नंतर ९ दिवसांनी पिडीत मुलगी शुद्धीवर आली होती. तिच्यावर दिली येथील सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर तिचा दि.२९/०९/२०२० रोजी सकाळी मृत्यू झाला आहे. पिडीतीची जीभ कापलेने ती काहीच बोलू शकली नाही. इशारेने तिने सर्व घटना जबाबामध्ये मांडली. बलात्कार करणाऱ्यान मध्ये संदीप, लवकुश, रामू आणि रवी या ४ नाराधमांचे तीने नावे घेतली आहे. या प्रकरणी समंधित गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा करावी अशी मागणी अन्यथा वंचित बहुजन आघाडी मनमाड शहराच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याची सरस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली याप्रसंगी. राजाभाऊ पगारे. पी.आर.निळे.कदीर भाई जी शेख. कैलास शिंदे. सुरेश जगताप. यशवंत बागुल. संतोष भोसले. उमेश भालेराव. कुणाल निरभवने. कैलास गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close