ताज्या घडामोडी

फैजपूर पालिकेचे आरोग्य निरीक्षक चावरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी – विरोधी गटनेते शेख कुर्बान*

*फैजपूर पालिकेचे आरोग्य निरीक्षक चावरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी – विरोधी गटनेते शेख कुर्बान*

“समस्या सुटत नसल्यामुळे थेट दुर्गंधीयुक्त घाण पाणी पालिकेत ओतून नागरिकांनी केला आंदोलन”

रावेर ता.प्रतिनिधी फरीद शेख सावदा

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या फैजपूर नगरपालिकेच्या हद्दीतील श्रीकृष्ण नगरात अनेक दिवसापासून गटारीतील साचलेल्या दुर्गंधीयुक्त घाण पाणी कचरा वेळेवर काढला जात नाही. सध्या टायफाईड, मलेरिया, वायरल इन्फेक्शन सह डेंग्यू सारख्या भयानक आजाराने डोके वर काढलेले असताना. येथील परिसरात पालिकेकडून स्वच्छता साफसफाई केली जात नसून गटारी तील विषारी किडेकिटकुल डांस मच्छरांची मोठी उत्पत्ती होऊन येथील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही सदरची समस्या दूर केले जात नसल्याने. थेट दुर्गंधीयुक्त घाण पाणी नगरपालिकेत ओतून नागरिकांनी दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी आंदोलन केल्याची घटना घडली आहे.

स सदरील प्रकार पालिकेत घडल्यामुळे तसेच शहरात सर्व ठिकाणी केरकचरा व गटारी ओव्हर फुल तुंळूबल्या अवस्थेत असल्याची तक्रार घेऊन बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारात ५ ते ६ नगरसेवक मुख्याधिकारी यांच्या दालनात गेले असता येथील आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांनी समस्या ऐकून न घेता नगरसेविकांशी अरेरावी करून थेट त्यांचा अपमान केला.सबब नगरसेविकांचा अपमान झाल्याच्या भावनेतून राष्ट्रवादीचे नगरसेवक व विरोधी गटनेते शेख कुर्बान शेख करीम यांनी आरोग्य निरीक्षक चावरे यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना नोटीस देण्यात यावी.अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी कडे करून त्याच्या प्रती थेट जिल्हाधिकारी जळगांव यांना सुद्धा पाठवण्यात आले आहे.

सदरील प्रकरणा बाबत फैजपुर नगरपालिकेचे विरोधीपक्षनेते व नगरसेवक शेख कुर्बान यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या टायफॉईड मलेरिया वायरल इन्फेक्शन इत्यादी विविध आजार पसरत असल्याने नागरिक चिंतेत असून पालिका प्रशासन शहर स्वच्छता बाबत गंभीर नसून उलट आरोग्य निरीक्षक गैर जबाबदारीने नगरसेवकांसह नागरिकांसोबत बेताल वागत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही म्हणूनच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी तक्रार मी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. लवकरच आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांना शिस्तभंगाची नोटीस मिळेल.

Share

Admin

काझी सलीम अल्लाउद्दीन 9850140788

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close