ताज्या घडामोडी

नवी मुंबई: प्रशांत गिलबिले पाटील नवी मुंबई प्रतिनिधी प्रेम पाटीलचा हरियाणायात कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत विक्रमी विजयी

नवी मुंबई: प्रशांत गिलबिले पाटील नवी मुंबई प्रतिनिधी

प्रेम पाटीलचा हरियाणायात कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत विक्रमी विजयी.

मागच्या आठवड्यामध्ये हरियाणा येथे आयोजित केलेल्या नॅशनल लेव्हल कुस्ती स्पर्धेमध्ये अंडर फोर्टीन 70 वजन गटात यामध्ये सुवर्ण पदका ची कमाई प्रेम मच्छिंद्र पाटील याने केली आहे.
प्रेम मच्छिंद्र पाटील हा कै.दगडू बाळू मोकाशी यांचा नातू असून त्याने हेदुटणे जिल्हा ठाणे गावाचे नाव बाहेरील राज्यात चमकवले आहे.
गावात आल्यानंतर त्याची मोठी मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढून सर्व गावं त्याचे कौतुक केले. याची दखल घेत पोलिस टाईम्स न्यूज नवी मुंबई ऑफिस कडून प्रेम पाटील याचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पोलीस टाइम्सचे उप संस्थापक अफजल देवळेकर सरकार यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदीप हिरामण मोकाशी, राजेश दगडू पाटील, महादेव बाळाराम मोकाशी उपस्थित होते.

Share

Admin

काझी सलीम अल्लाउद्दीन 9850140788

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close