कृषी

कांदयावरील निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी याकरिता खा.डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पियूष गोयल यांची भेट.

माझ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात बहुसंख्य शेतकरी कांदा उत्पादक खा.भारतीताई पवार

कांदयावरील निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी याकरिता खा.डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पियूष गोयल यांची भेट.

*आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील माझ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात बहुसंख्य शेतकरी कांदा उत्पादक असून येथे मोठ्या प्रमाणात दर्जेदार कांदा पिक घेतले जाते येथील शेतकऱ्यांची त्यावर अवलंबून असलेल्या व्यापारी वर्गाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांदयावर अवलंबून आहे. सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा हा निर्यातिसाठी सीमेवर अड़कुन पडला आहे. त्यासाठीहि सीमा खुली करावी. कांदयाच्या किमती खुप वाढल्या नसून अजूनही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात असल्याने तातडीने निर्यात बंदी उठवने गरजेचे आहे. आधीच लॉकडाउनच्या संकटकालातुन शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असतांना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल व त्यांचे मोठे नुकसान होईल. ह्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करुन आपण कांदयावरची निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतुकदार यांना दिलासा द्यावा असे निवेदन खा.डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पियुषजी गोयल यांना दिले असून लवकरच ह्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन विचार विनिमय करुण निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close