क्राईम

येवला तालुक्यात थोड्याच दिवसात नावा रुपाला आलेल्या दोन पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखस्त ! ठेवीदारांमध्ये तुफान खळबळ ! पोलीस टाईम्स मालेगांव(नाशिक)प्रतिनिधी:-मनोहर पानसरे

गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या.येवला या संस्थेचे संचालक मंडळ निष्प्रभावित करण्यात आले

येवला तालुक्यात थोड्याच दिवसात नावा रुपाला आलेल्या दोन पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखस्त ! ठेवीदारांमध्ये तुफान खळबळ !
पोलीस टाईम्स मालेगांव(नाशिक)प्रतिनिधी:-मनोहर पानसरे
ता.27/9/2020 येवला तालुक्यातील बऱ्याच दिवसापासून गोंधळ सुरू असलेल्या व थोड्याच दिवसात नावारुपाला आलेल्या संस्थांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एकनाथ पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम ७७- अ , ( ब -१ ) व कलम ७७ – अ ( फ ) च्या अधिकारानसार …. श्री गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या.येवला या संस्थेचे संचालक मंडळ निष्प्रभावित करण्यात आले आहे.व प्राधिकृत अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रेणी -१ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला आर.पी.जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कारण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० व नियम १ ९ ६१ तरतुदींचे आणि उपविभागीय तरतुदीचे उल्लंघन करणे , पोटनियम बाह्य कामकाज करणे , संचालक मंडळाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यास अक्षम्य निष्काळजीपणा करणे , संचालक मंडळाचे कामकाज योग्यरीत्या न करणे , ठेवीदारांच्या अर्जावर योग्यरीत्या कार्यवाही न करणे , नियमबाह्य कर्जवाटप करणे , आणि संस्थेच्या कार्यालयास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी भेट दिल्यास कार्यालय सतत बंद असणे ,
संस्थेचे दप्तर उपलब्ध न करून देणे , या सारख्या इतर बेकायदेशीर बाबी दर्शनात आल्या असल्याने संस्थेवर विनीदीइष्ट अहवालाच्या अनुषंगाने सनदी लेखापाल के.पी.एन.अँडकंपनी नाशिक यांनी १६ जून २०२० रोजी येवला पोलीसात संचालकां विरोधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम ८११५ ) ब नुसार गुन्हा नोंदवला आहे .
या संबंधी सहाय्यक निबंधक येवला सहकारी संस्था एकनाथ पाटील यांनी संस्थेचा वसूल झाल्यास ठेवीदारांच्या ठेवींचा विचार करू असे म्हटले आहे.तसेच याच बरोबर धनश्री(महिला संस्थेवर सुद्धा प्रशासक नेमले असल्याची माहिती समोर आली आहे,मात्र या प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close