ताज्या घडामोडी

जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मा.ना. छगन भुजबळ साहेब व मा.खा.समीरभाऊ भुजबळ यांच्या वाढदिवसानिम्मित आयोजन :-सायगाव प्रतीनीधी भालेराव येवला

 

जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मा.ना. छगन भुजबळ साहेब व मा.खा.समीरभाऊ भुजबळ यांच्या वाढदिवसानिम्मित आयोजन
सायगाव एकनाथ भालेराव
येवला दि.२८ (प्रतिनिधी):- मा.ना. छगन भुजबळ साहेब व मा.खा.समीरभाऊ भुजबळ यांच्या वाढदिवसानिम्मित नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून सदर वक्तृत्व स्पर्धा हि ऑनलाईन असून कमीतकमी ५ मिनिटांचा व्हिडीओ आयोजन समितीच्या वतीने मागविण्यात आलेला असून या मध्ये खालील ३ विषय देण्यात आलेले आहे. १) नाशिक जिल्ह्याच्या विकासाची एकच चळवळ छगन भुजबळ, समीर भुजबळ २) मांजरपाडा प्रकल्पाचे आधुनिक भागीरथ ३) २००९-२०१४ या काळात नाशिक जिल्ह्याला मिळालेल्या विकास कामांची संजीवनी या तीन विषयांवर सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. व त्यांचे नियम व अटी पुढीलप्रमाणे राहतील १) व्हिडीओ ०५ मिनिटांचा असावा. २) व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख ०६ ऑक्टोबर २०२० पर्यंत असेल. ३) स्पर्धा फक्त नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी आहे. वयोमर्यादा १८ च्या पुढील विद्यार्थ्यासाठी आहे.
त्या सोबतच चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. यामध्ये विषय नाशिकचा विकास. त्याचे नियम व अटी ते पुढीलप्रमाणे १) प्रवेश शुल्क मोफत २) कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावमुळे स्पर्धकांनी आपले चित्र घरीच तयार करणे बंधनकारक आहे. ३) चित्रकला स्पर्धेसाठी नोंदणी बंधनकारक आहे. ४) आयोजकांकडून व्हॉटसअप वर पाठविलेले चित्र काढणे बंधनकारक आहे. ५) नोंदणी करण्याची तारीख ०१/१०/२०२० ते ०५/१०/२०२० पर्यंत आहे. ६) चित्र जमा करण्याची तारीख १२/१०/२०२० पर्यंत दुपारी ४ पर्यंत राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका, नाशिक येथील कार्यालयात श्री. संदीप खेडकर ९८३४४२९३३९ यांच्याकडे जमा करणे. ७) चित्रकलेच्या उत्कृष्ट टायटला ३००० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांनी केले. *वक्तृत्व स्पर्धेचे समन्वयक येवला तालुकाध्यक्ष दिनेश भालेराव मोबा. नं. ९५६१२२८२९२* व *चित्रकला स्पर्धेचे समन्वयक गणेश गवळी मोबा. नं.७०३८३३९७०१* हे आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close