ताज्या घडामोडी

लासलगाव येथे रेल्वे इंजिन खाली* *उडी घेऊन आई व* *मुलाची आत्महत्या*( भारती धिंगान प्रतिनिधी याजकडून)

*लासलगाव येथे रेल्वे इंजिन खाली* *उडी घेऊन आई व* *मुलाची आत्महत्या*( भारती धिंगान प्रतिनिधी याजकडून) लासलगाव/ आज सकाळी लासलगाव रेल्वे स्टेशन जवळ धावत्या रेल्वे इंजिन समोर अंजली भुसनळे यांनी उत्कर्ष या मुलांसह दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली.येवला बस आगारांमध्ये एसटी वाहक म्हणून अंजली भुसनळे कार्यरत होत्या. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. दोघांचे मृतदेह घटनास्थळावरून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अंजली व त्याच्या मुलाने इतके टोकाचे पाऊल का?उचलले दोघांनी आत्महत्या का?केली याबाबत लासलगाव पोलीस कसून शोध घेत असल्याचे समजते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close