ताज्या घडामोडी

काजी ए शरीयत हजरत मौलाना इर्शादुल्लाह मखदुमि कासमी दामत बरकातहूम यांची जमियत उलेमा हिंद या सामाजिक संस्थेवर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल मुस्लिम सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गफ्फारखान पठाण, मौलाना अनवर शहा,हाफीज रीयाज शहा,काजी नबी हसन,वसीम पठाण , नदीम पठाण, नजीर टेलर्स,यांच्या कडून हार्दिक सत्कार करुन त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यावेळी मौलाना इर्शादुल्लाह कासमीनीं आभार व्य्क्त करतांना म्हणाले की जमियत उलेमा हिंद ही देश भरात असून ही संस्था देश हिताकरिता काम करते.व जनकल्याणा साठी आग्रेसर असते ,त्यावेळी बोलताना म्हणाले मला मिळालेली संधी चे सोन करुन जन हितासाठी काम कले जाईल, व सामाजिक न्याय हक्का साठी जमियत उलेमा हिंद च्या माध्यमातून लढा देऊ समाजातील सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देऊ अशी इच्छा त्यावेळी प्रगट केली.
मौलाना इर्शादुल्लाह कासमी बऱ्याच सस्थेवर कार्यरत असून .दारुल कजा या इस्लामी शरियत (कोर्टाचे) अध्यक्ष आहेत .त्या अनुषंगाने मुस्लीम महीला पुरुषांना न्याय देण्याचे काम करतात.श्रीरामपूरात मदरसा मदीनतुल उलुमच्या माध्यमातून अनाथ मुलांना मोफत शिक्षण देऊन त्यांना अन्न वस्र निवारा देण्याचे देखील त्यांच्या कडून केले जाते. हि प्रेरणा त्यांचे वडील आदरणीय मौलाना मखदूम हुसेन रहतुल्लाह अलैहि कडून मिळाली.आज त्यांनी आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण केले .त्यावेळी गफ्फारखान पठाण यांनी मौलाना साहेबांना सुख समृद्धी दीर्घ आयुष्य करीता मन पूर्वक शुभेच्छा दिल्या .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close