ताज्या घडामोडी

सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणारे ऍड फरीदा मिठाईवाला यांच मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती तर्फे वाढदिवस साजरा,

 

 

मनमाड प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

मनमाड.शहरात महिला विषयी न्याय व हक्का साठी नेहमी संघर्षवादी असलेल्या महिलां मध्ये सर्वात प्रथम नाव येते ते ऍड फरीदा मिठाईवाला त्याचे कारण असे की महिला घरेलू हिंसा, महिला अत्याचार पीडित महिलांच्या बाजूने न्याय व संघर्ष साठी मॅडम सक्षम उभे असतात, तसेच शहरात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक असे विविध सामाजिक कार्यात ऍड मॅडम हे नेहमी अग्रेसर राहतात,

शहरातील जन्मलेल्या मुलांचे नाव त्यांच्या स्वतःच्या जन्म दाखल्यावर यावे या साठी शासनानी दिलेली मुदत या वर लक्ष केंद्रित करून ऍड फरीदा मिठाईवाला यांनी शहरात विशेष अभियान देखील राबिवले होते,त्या अभियानात हजारो लोकांनी लाभ घेऊन आपल्या मुलांचे नाव जन्म दाखल्यावर नोंद करून घेतले आहे,
असे विविध सामाजिक कार्य ऍड फरीदा यांच्या मार्फत राबविण्यात आले आहे, त्यांच्या कार्याची पावती व दखल म्हणाव की आज शहरातील विविध सामाजिक संघटना तर्फे त्यांचं वाढदिवसा निमित्त त्याचे शॉल व पुष्प देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले आहे, या वेळी,मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती तालुकाध्यक्ष कयाम सैय्यद,शहराध्यक्ष कादिर शेख,महिला शहराध्यक्षा मुमताज आपा बेग,शहर सचिव अफरोज अत्तार,युवा शहराध्यक्ष सद्दाम अत्तार,शहर संघटक सोहेल जाफरी, सोबत इतर संघटनांची ही पदाधिकारी उपस्तीत होते,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close