ताज्या घडामोडी

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव प्रकरणी : गट शिक्षणाधिकारी यांची भूमिका संशयास्पद…!

*आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव प्रकरणी : गट शिक्षणाधिकारी यांची भूमिका संशयास्पद...!* ("रावेर पंचायत समिती येथील प्रकार") ठळक मुद्दे सभापती यांना अंधारात ठेवून प्रस्तावावर घेतल्या सह्या. शिक्षक पुरस्कार प्रस्ताव बाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी का मागितली माफी? गट शिक्षणाधिकारीस "अशी गंभीर चूक व्हायला नको" असे बोलून गट विकास अधिकारी झाले मोकळे. शिक्षक पुरस्कार प्रस्ताव जि.प कडे सादर करण्यासाठी पं.स सभागृहाला अंधारात ठेवण्याचे कारण काय? या प्रकरणाकडे जि.प. प्रा. शिक्षण अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज. लवकरच या गंभीर प्रकरणाविषयी काही जागृत नागरिकांकडून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात येईल.

 

रावेर ता.प्रतिनिधी फरीद शेख सावदा

 

रावेर ता.जि.जळगांव येथील पंचायत समिती सभागृहात दि.९ सप्टेंबर २०२१ गुरुवार रोजी घेण्यात आलेली आढावा बैठकीत शिक्षक पुरस्कार प्रस्तावा पंचायत समिती रावेरच्या सभागृहाला अंधारात ठेवून जिल्हा परिषद जळगांव येथे परस्पर प्रस्ताव पाठवण्यात आल्याच्या कारणावरून आढावा बैठकीत उपस्थित जागृत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने येथील गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी सभागृहात चक्क माफी मागितल्याने एकच खळबळ उडाली होती.

यावेळी सभापती यांनी सदरील पुरस्कार कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आला अशी थेट विचारणा गट शिक्षणाधिकारी दखणे यांना केली. दखणे यांनी आपल्या म्हणजे सभापतीच्या शिफारशीवरून दिल्याचा मुद्दा मांडला यामुळे सभापतीच्या भूमिकेबाबत बैठकीत संभ्रम निर्माण झाला मात्र सभापती यांनी असे पत्र न दिल्याचे यावेळी सांगितले.

मात्र यामुळे सभागृहात आढावा बैठकीत जागृत सदस्यांकडून जाहीर झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार संबंधी आर्थिक देवाण-घेवाण, झाल्याची शक्यता सह परस्पर प्रस्ताव जि.प. मध्ये पाठवणारे कोण? तीन आपत्य असतांना पुरस्कार देता येतो का? नेमके किती प्रस्ताव आले होते? रावेरमधून कोणाचा प्रस्ताव आला नव्हता का? इतर शिक्षकांना माहिती देण्यात आली नव्हती का? असे पुरस्काराशी निगडित विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावरून गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी विचारणा करून गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांना “अशी गंभीर चूक व्हायला नको” फक्त आढावा बैठकीत एवढेच सांगून मोकळे झालेले दिसत आहे.

तरी पुरस्काराशी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे नाही का? जाणीवपूर्वक रित्या अशी गंभीर चूक करणारे गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली पाहिजे असे गट विकास अधिकारी यांना वाटत नाही का? तसेच सदर प्रकरणी सभापती यांना अंधारात ठेवणारे कोण? तरी सदरील जाहीर झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द करून पुन्हा प्रमाणिकपणे नियम प्रोसिजर अनुसार फेर कार्यवाही होऊन खरोखर पात्र शिक्षकास हा पुरस्कार देण्यात यावे

म्हणून या गंभीर दखल पात्र प्रकरणाची प्राथमिक शिक्षण अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करतील का? याकडे आता सर्व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. तसेच असे न झाल्यास लवकरच काही जागरूक नागरिक या प्रकरणाची सविस्तर तक्रार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळालेली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close