ताज्या घडामोडी

पंचवटीतील सेवाकुंज येथे शुल्लक तत्कालीक कारणावरून तरूणाचा गळ्यावर वार करून खुन कोणताही क्लु नसतांना अथक परिश्रमाने आरोपी ताब्यात

पंचवटी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी

 

 

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक -दिनांक १०/०९/२०२१ रोजी रात्री २१:०० वा. चे सुमारास सेवाकुंज, पंचवटी, नाशिक याठिकाणी एक इसम
हा जखमी अवस्थेत पडला आहे बाबत पंचवटी पोलीस ठाणेस माहीती मिळाल्याने लागलीच पंचवटी पोलीस ठाणेस
कर्तव्यावर हजर असलेले गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सी. आर. मोबाईल वाहनावरील पोलीस अंमलदार असे सेवाकुंज याठिकाणी गेले असता श्रीयश स्किन क्लिनीक सेंटर समोर, निमाणीकडे जाणाऱ्या रोडवर,
सेवाकुंज, पंचवटी, नाशिक येथे एक इसम वय अंदाजे ४० वर्षे हा जखमी अवस्थेत पालथा पडलेला दिसल्याने पोलीसांनी त्यास पाहीले असता त्याचे गळ्याला गंभीर दुखापत झालेली व तो बेशुध्द अवस्थेत असल्याने त्यास लागलीच औषधोपचारकामी सिव्हील हॉस्पीटल, नाशिक याठिकाणी दाखल केले असता त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासुन मयत घोषीत केले आहे. सदर बाबत पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक / प्राजोक्त जगताप यांनी अज्ञात इसमा विरूध्द दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणेस गुन्हा रजि.नं २९५/२०२१ भा.दं. वि. कलम ३०२ अन्वये दाखल करण्यात आला आहे. सदर घटने बाबतची माहीती गस्तीवरील सपोनि/सत्यवान पवार यांनी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच वरिष्ठ अधिकारी व नियंत्रण कक्ष यांना दिली. त्यानुसार मा. श्री. दीपक पाण्डेय सो, पोलीस आयुक्त नाशिक शहर, यांचे आदेशानुसार घटनास्थळी श्री. संजय बारकुंड, पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल तांबे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १, श्री. मधुकर गावीत, सहा. पोलीस आयुक्त विभाग १, डॉ. सिताराम कोल्हे,वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पंचवटी पोलीस ठाणे, श्री. विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गुन्हेशाखा युनिट क्र. १श्री. आनंदा वाघ वपोनि गुन्हे शाखा युनिट क्र. २ श्री. कुंदन जाधव व डॉ. आंचल मुदगल पोनि/मध्यवर्ती गुनहे
शाखा, श्री. इरफान शेख वपोनि आडगाव पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस अधिकारी / अंमलदार
व पंचवटी, आडगाव म्हसरूळ पोलीस ठाणेचे गुन्हेशोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन वरिष्ठांचे मार्गदर्शना खाली तातडीने तपासाची चक्रे फिरवुन प्रथम मयत इसमाबाबत माहीती घेतली असता सदर मयत इसमाचे नाव सुनिल असे असुन तो बिगारीकाम करून गंगाघाट परिसरात राहत असले बाबत सदत्वी घटना प्रत्यक्ष पाहणारे इसम श्री मोनु शामलाल बसोड (सागरबाबा) व दिनेश नायर यांनी समक्ष पाहून खात्री करून
सांगितले आहे.
त्यानंतर घटनास्थळी हजर असलेले सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर
गुन्हयातील आरोपीताचा शोध व माहिती घेण्यासाठी घटाना स्थळाच्या आजुबाजुचा परिसर पिंजून काढला असता
अवघ्या १२ तासांचे आत सदर गुन्हयाचे संदर्भात एका संशयितास तपोवन परिसरातील गार्डनमधुन ताब्यात घेण्यात
पोलीसांना यश आले आहे. सदर इसमाचे नाव पंडीत रघुनाथ गायकवाड उर्फ पंडया उर्फ लंगडया वय ३२ वर्षे रा.
पिंपळद ता. त्र्यंबकेश्वर, नाशिक असे असुन त्यानेच मयताचे गळ्यावर कटरने वार करून गंभीर जखमी केल्या बाबत
समक्ष पाहणाऱ्या साक्षीदारांनी सांगितले आहे. सदर आरोपीत इसम हा त्र्यंबकेश्वर येथील रेकॉर्डवरील मालाविरूध्द
व शरीराविरूध्दचा गुन्हेगार असून त्याची मयत व साक्षीदारांची काही एक ओळख नाही. मयत व साक्षीदार हे फुटपाथवर बसलेले असतांना आरोपी हा त्यांचेकडे बिडी पिण्याच्या बहाण्याने जावुन त्यांना २०/- रूपये दारू
पिण्यासाठी मागु लागला त्यात त्यांचा वाद होवुन त्याने त्याचेकडील कटरने मयताचे गळ्यावर अत्यंत क्षुल्लक
कारणासाठी वार करून गंभीर जखमी केले व पळून गेला. सदर आरोपीने गुन्हा केल्याची खात्री झाल्याने त्यास सदर
गुन्हयात अटक करण्यात येणार आहे.
मयताचे वर्णन :- मयताचे नाव सुनिल असुन वय अंदाजे ४० वर्षे त्याचे उजव्या हाताचे कांबीवर मराठीतुन सींदर व त्याचे बाजुला इंग्रजीतून ‘S’ अक्षर व उजव्या हाताचे ‘ॐ’ व इंग्रजीतून ” अक्षर तसेच त्याचे छातीवर ”अधक्षर गोंदलेले आहे. सदर इसमाची ओळख पटली नसुन नातेवाईकांचा अद्याप शोध
लागलेला नाही

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close