ताज्या घडामोडी

कसं आहे ना

कसं आहे नाu

*कसं आहे ना?*

एक कागदाचं
पान असतं…!!

*’श्री’* लिहलं, की
पूजलं जातं …

*प्रेमाचे* चार शब्द
लिहले, की
जपलं जातं…

काही *चुकीचं*
आढळलं, की
फाडलं जातं…

एक कागदाचं
पान असतं…!!

कधी त्याला
*विमान* बनवून
भिरकावलं जातं…

कधी *होडी* बनवून
पाण्यात सोडलं जातं…

कधी *भिरभिरं* बनवून
वाऱ्यावर फिरवलं जातं…

आणि कधी तर
*निरुपयोगी* म्हणून
चुरगाळलंही जातं…

एक कागदाचं
पान असतं….!!

जे लेखकाच्या
*लेखणीला* हात देतं…

जे चित्रकाराच्या
*चित्राला* साथ देतं…

जे व्यापाऱ्याच्या
*हिशोबाला* ज्ञात ठेवतं…

आणि हो,
वकीलासोबत *कोर्टात* गेलं,
की *साक्षही* देतं…

एक कागदाचं
पान असतं…..!!

*पेपरवेट* ठेवलं, की
एकदम गप्प बसतं…

काढून घेतलं, की
*स्वच्छंदी* फिरतं आणि
कशांत अडकलं, तर
*फडफडायला* लागतं…

एक कागदाचं
पान असतं…..!!

ज्यावर बातम्या छापल्या,
की *वर्तमानपत्र* बनतं…

प्रश्न छापले, की
*प्रश्नपत्रिका* बनतं…

विवाहाचं निमंत्रण छापलं,
की *लग्नपत्रिका* बनतं…

तर कधी आदेश~संदेश
लिहले, की तेच *टपालही*
बनतं…

एक कागदाचं
पान असतं….!!

*माणसाच्या* जीवनांत
आणि *त्यांत* खूप
*साम्य* असतं…!!

एक कागदाचं
पान असतं…!!
जन्मला आला तर birth certificate असतं
निधन झाला तर Death certificate असतं
एक कागदाचं
पान असतं 🌹🌺🌷

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close