ताज्या घडामोडी

अवैधरित्या गोवंश घेऊन जाणाऱ्या कंटेनरला सावदा पोलिसांनी पकडला : सर्व गायीची केली गोशाळेत रवानगी* “कंटेनर मध्ये ४०च्यावर गोवंश अतिशय निर्दयपणे कोंबलेल्या होत्या.”

*अवैधरित्या गोवंश घेऊन जाणाऱ्या कंटेनरला सावदा पोलिसांनी पकडला : सर्व गायीची केली गोशाळेत रवानगी*

“कंटेनर मध्ये ४०च्यावर गोवंश अतिशय निर्दयपणे कोंबलेल्या होत्या.”

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंप जवळ ४० च्यावर गायी भरलेल्या एका दहा चाकी कंटेनर ला गुप्त माहितीच्या आधारे सावदा पोलिसांनी पकडल्याची घटना दि.९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडलेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कंटेनर मध्ये गुप्त पद्धतीने अतिशय निर्दयपणे सुमारे ४०च्यावर गायी व गुरे यांची कोंबून अवैधरित्या वाहतूक करणारा दहा चाकी कंटेनर क्र.UP 21 BN 8386 हा रावेर कडून फैजपूर कडे जाताना थेट सावदा पोलिसांनी रिलायंस पेट्रोल पंपाजवळ पकडून त्यावर कारवाई केलेली आहे. सदरील कंटेनरचा चालक फरार झाला असून गायीने भरलेला हा कंटेनर आधी कुसुंबा येथील गोशाळेत नेले मात्रे काही कारणास्तव सदरील गायी भरलेला कंटेनर तेथून जळगांव येथे बाफना गोशाळेत नेण्यात आला.त्या ठिकाणी सर्व गायी गुरे सुरक्षित ठेवण्यात आलेली आहेत.

यानंतर कंटेनर पोलिसांनी जप्त करून सदरील संवेदनशील प्रकार बाबत अनोळख्या १ व्यक्तीवर सावदा पोलिस ठाण्यात गु.र.नं.१३६/२०२१ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधि.१९६० चे कलम ११(१) व ११(१) एच / म. महाराष्ट्र पशु आधि.१९७६ चे कलम ५,९,११९ महाराष्ट्र मो.वा.१९८८ कायद्याचे कलम ८३ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र सदरील अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणारा कंटेनर कुठून येत होता व कुठे जात होता याचा चालक-मालक कोण? इत्यादी बाबींची चौकशी व पुढील तपास कर्तव्यदक्ष एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाईल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close