ताज्या घडामोडी

महामार्गावरील खड्डे २ दिवसात बुजवण्यात येईल सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली ग्वाही*

नगरसेवक राजेश वानखेडे यांनी खड्ड्यात वृक्षरोपणाचा दिला होता इशारा"

*महामार्गावरील खड्डे २ दिवसात बुजवण्यात येईल सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली ग्वाही*

“नगरसेवक राजेश वानखेडे यांनी खड्ड्यात वृक्षरोपणाचा दिला होता इशारा”

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर राज्य महामार्ग वरील साईबाबा मंदिर ते एलआयसी बिल्डिंग पर्यंतच्या रस्त्यात अतिशय धोकादायक व जीवघेणे मोठमोठे खड्डे अनेक दिवसापासून पडलेले असता याकडे जाणीवपूर्वक रित्या सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा कडून दुर्लक्ष केले जात होते. याचा फटका थेट वाहनधारकांसह पायी ये – जा करणाऱ्या सर्वसामान्य महिला पुरुष यांना बसत होता.

म्हणूनच नागरिकांनी तक्रार केल्यानंतर सदरील खड्डे दुरुस्ती व्हावी यासाठी दि.८ सप्टेंबर २०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा चे कार्यकारी अभियंता यांची राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेश वानखेडे यांनी समक्ष भेट घेऊन सदरील प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.व लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने खड्ड्यात वृक्षरोपण करण्यात येईल असा इशारा दिला होता.

विशेष बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग हा खानदेशाची जीवनवाहिनी म्हणून ओळखला जात असल्याने या महामार्गावर सावदा शहराच्या दुतर्फा रावेर रोडवरील एलआयसी बिल्डिंग जवळ तर फैजपूर रोडवर साईबाबा मंदिराजवळ अनेक दिवसापासून मोठमोठ्या खड्डे असल्याने हे खड्डे येत्या दोन दिवसात बुजवण्यात येतील अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एन.शेख यांनी त्यावेळी सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे यांना दिली आहे.

सदरील महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते यात सावदा येथून केळीने भरलेले ट्रक नेहमी ये-जा करीत असतात व या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे केळी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असते वेळप्रसंगी गाडी नादुरुस्त होऊन शेतकऱ्याचा माल जागेवरच पिकण्याची भीती असते तसेच सदरील खड्ड्यात पावसाळ्याचे साचलेले मातीमिश्रित घाण पाणी पायी ये- जा करणारे महिला पुरुष यांच्या अंगावरील उडीत असल्याने याचा मोठा त्रास यांनाही सहन करावा लागते. सबब या महामार्गावरील संपूर्ण खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अन्यथा या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल अशी चेतावणी सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी दिली होती त्याची तात्काळ दखल घेत कार्यकारी अभियंता बी एन शेख यांनी या महामार्गावरील खड्डे येत्या दोन दिवसात बुजवण्यात येतील असे सांगितले आहे.

*राजेश वानखेडे यांनी केले वृक्षारोपण*

सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सावदा येथील बरानपुर अंकलेश्वर महामार्ग च्या खड्या संदर्भात भेट घेण्यासाठी गेले असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात बी.एम. शेख यांनी वानखेडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेतले.यावेळी दिलेले आश्वासनाची पूर्तता केल्यास महामार्ग वरील खड्ड्यामध्ये देखील असेच वृक्ष रोपण करण्यात येईल असा इशाराही वानखेडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close