ताज्या घडामोडी

चिंताजनक :- बिबट्याचा गायीवर हल्ला : पाडळे खुर्द ता.रावेर येथील प्रकार*

*चिंताजनक :- बिबट्याचा गायीवर हल्ला : पाडळे खुर्द ता.रावेर येथील प्रकार*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या पाडळे खुर्द या गावातील शेत शिवारात चराईसाठी गेलेल्या गाईला बिबट्याने केल्याची घटना तीन दिवसापूर्वी सायंकाळी घडलेली आहे. यामुळे येथील परिसरातील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेत. याआधी रावेरात हिंस्त्र प्राण्याच्या धुमाकूळ वनविभागाकडून थांबता थांबत नसून त्यात सदरील घटना बिबट्या सारख्या जीवघेण्या प्राणीने केल्याने नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेत. यामुळे तात्काळ वनविभागाकडून याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पाडळे खुर्द येथील रहिवासी हबीब तडवी यांची पाळीव गाय जंगलात चराईसाठी गेली असता बिबट्याने अचानकपणे त्यावर हल्ला करून थेट गाय फस्त केली. गायचा दिवसभर शोध केला असता गाय मृतावस्थेत मिळून आली. याची माहिती मिळताच घटनास्थळी पंचायत समिती सदस्य जुम्‍मा तडवी यांनी भेट देऊन पाहणी केली असता हल्ला करणारा प्राणी बिबट्या असल्याचे सांगण्यात आले. तसेच यापूर्वीच सदरील भागात एक कुत्रा व शेळीवर देखील असंच हल्ला करून फस्त केल्याची घटना घडलेली होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी वनपाल अतुल तायडे पाडळे खुर्द येथे रवाना झाले आहे.

(“हिंस्त्र प्राण्याची दहशत कायम”)

सदरील घटना पूर्वी रावेरमध्ये धुमाकूळ घालून सुमारे थेट ४० शेळ्या फस्त करणारा हिंस्त्र प्राण्याचा संबंधित वन विभागाला अजून थांगपत्ता लागलेला नाही. खबरदारी म्हणून शहरात वन विभागातर्फे गस्त फेऱ्या वाढवण्यात आले तरी हिंस्त्री प्राण्यांची दहशत रावेरात मात्र नागरिकांमध्ये कायमच आहे.

म्हणून संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर व अतिसंवेदनशील बाबकडे लक्ष देऊन सदरील जीवघेण्या प्राण्या चा शोध तात्काळ लावण्यासाठी उपाय योजना करून त्यांना जेरबंद करून नागरिकांना भयमुक्त करणे गरजेचे आहे. सदरील घातक प्राण्याकडून दुर्दैवाने भविष्यात एखाद्या नागरिकवर हल्ला झाल्यास त्याचे जीवाचे काही कमी जास्त झाले तर याला जबाबदार कोण? हा भयावह व चिंताजनक प्रश्न उपस्थित झालेला आहे. हे मात्र खरे आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close