ताज्या घडामोडी

पाटोदा येथे “गणेशोत्सवाच्या” पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक* पोलीस हवालदार रजपूत दादा यांनी केले मोलाचे मार्गदर्शन

*पाटोदा येथे “गणेशोत्सवाच्या” पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक*

पोलीस हवालदार रजपूत दादा यांनी केले मोलाचे मार्गदर्शन

प्रतिनिधी/एजाज देशमुख

पाटोदा (तारीख 9 सप्टेंबर 2021) येथे रामेश्वर मंदिराच्या सभामंडपामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अनिल भवारी साहेब यांच्या आदेशाने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला पाटोदा ग्रामपंचायत चे सरपंच श्री प्रताप पाचपुते हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून येवला ग्रामीण पोलीस स्टेशनचे पाटोदा बिटचे हवलदार श्री रजपूत दादा व त्यांचे सहकारी श्री लकडे दादा, श्री बनकर दादा उपस्थित होते. यावेळी श्री राजपूत दादा यांनी होऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या संदर्भात सरपंच सह गावकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यातप्रामुख्याने गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे शासनाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन न करता हा उत्सव साजरा करावा . असे आव्हान केले .तसेच गणेशोत्सवाच्या काळात संस्कृतिक कार्यक्रम घेऊन गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी या काळामध्ये शक्यतो “एक गाव एक गणपती “ही संकल्पना अमलात आणावी. त्याचप्रमाणे या काळात रक्तदान शिबिरास सारखे कार्यक्रमाचे आयोजन करावे. कोविंडअजूनही गेलेला नाही ही गोष्ट लक्षात घेता मास लावणे, गर्दी टाळणे, प्रत्येक व्यक्तीने माझे गाव माझी जबाबदारी या सर्व गोष्टी प्रामुख्याने करावेत. तसेच कोणत्याही प्रकारे आपल्या गावाला व आपल्या गावातील शांततेला गालबोट लागणार नाही याची प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी. अशा पद्धतीचे अति महत्वाचे व मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पाटोदा ग्रामपंचायत चे सदस्य राहुल वरे, ज्ञानेश्वर जाधव, संतोष दौंडे, अंकुश बोराडे, उपसरपंच रईस देशमुख , उस्मान भाई शेख, सतीश वाघ, आदींसह गावातील सामाजिक कार्यकर्ते कैलास घोरपडे, सोमनाथ भिसे, संपतराव बोरणारे, विलास पवार, लखन पगारे, नंदू बोरसे, संजय गोसावी असे अनेक युवक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते, यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री अंकुश बोराडे यांनी श्री लकडे दादा व श्री रजपूत दादा यांनी केलेल्या सूचनावजा आदेशाचे काटेकोरपणाने गाव पालन करेल व कोणत्याही प्रकारे शांततेला गालबोट लागणार नाही अशी ग्वाही दिली, तर सूर्यकांत बोरनारे यांनी येवला ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री अनिल भवारी साहेब व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close