ताज्या घडामोडी

योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल राहुल येवला यांचा चामकोतर्फे भव्य सत्कार

*योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल राहुल येवला यांचा चामकोतर्फे भव्य सत्कार*
चांदवड तालुका प्रतिनिधी /सुनिलआण्णा सोनवणे

योगाचा प्रचार- प्रसार व सामाजिक आरोग्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून योगशिबिरांचे व उपक्रमांचे उत्कृष्ट व यशस्वीरित्या आयोजन करत असल्याबद्दल एस. एन. जे. बी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे योग प्रशिक्षक, योग विद्या धामचे केंद्रप्रमुख तसेच योगदर्शन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय सचिव राहुल (अंबादास) बी. येवला यांचा चांदवड मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे चेअरमन नरेंद्र कासलीवाल, यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

राहुल येवला यांनी
२१ जून २०२१ आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने केंद्रामार्फत आयोजित आणि आयुष मंत्रालय अंतर्गत इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन,दिल्ली व पारस मिरॅकल यांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यात प्रथमच चांदवड तालुक्यातील नागरिकांसाठी “मोफत जलनेती प्रशिक्षण अभियान” यशस्वीरीत्या राबवले असून त्याचा दोन हजाराहूनअधिक नागरिकांनी लाभ घेतला.

कोरोना काळात नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व आवश्यक सेवाकार्य त्यांच्या हातून होत आहे .

तसेच योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व योगदानाबद्दल आणि योग क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनेत उच्च पदावर काम करत असल्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मान झालेले आहेत नुकताच त्यांना अखिल भारतीय शिक्षक महासंघातर्फे राष्ट्रीय पातळीवर सन २०२१ साठी उत्कृष्ट योगशिक्षक पुरस्कार मिळालेला आहे

राहुल येवला सरांचे योग प्रचार व प्रसाराचे कार्य व समाजाच्या आरोग्यासाठी असलेले योगदान खरोखरच प्रशंसनीय व प्रेरणादायी असून चांदवडकरांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन चेअरमन नरेंद्र कासलीवाल यांनी केले. यावेळी व्हा. चेरमन सचिन खैरनार, संचालक डॉ. संजय कोकणे, मुख्य व्यवस्थापक सचिन सूर्यवंशी, व्यवस्थापक अनिल सांगळे व बँकेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सत्काराबद्दल बँकेचे संचालक अशोक व्यवहारे, राजकुमार संकलेचा,भूषण पलोड, मुन्नाभाई घासी, अनिल कोतवाल, जाकीर शहा, सुनील कबाडे, जगन्नाथ राऊत, महेंद्र कंकरेज, राजेंद्र ठाकरे, सुरेश खैरे, भारती देशमुख, रेखा शिंदे, राजेंद्र बिरार, राहुल डुंगरवाल, सचिन सूर्यवंशी आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच एस. एन. जे. बी. संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, योग विद्या योगदर्शन फाउंडेशन अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा आदि संघटनेतर्फे तसेच योगशिक्षक योगसाधक, आणि चांदवड ग्रामस्थ व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले असून राहुल येवला यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close