ताज्या घडामोडी

अंबिवली टिटवाळा कल्याण आटाळी रिंगरोड बांधीत ८४५ चाळ राहिवाशीयांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा आझाद मैदानावर मोर्चा*

*अंबिवली टिटवाळा कल्याण आटाळी रिंगरोड बांधीत ८४५ चाळ राहिवाशीयांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा आझाद मैदानावर मोर्चा*
*

भारती धिंगान नाशिक*

मुंबई -दि ८ चाळ रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या व चाळ रहिवाशांच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर दयाल बहादूरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्च्या काढण्यात आला कल्याण ते टिटवाळा रिंगरॉडचे बांधकाम एम एम आर डी ए च्या माध्यमातून चालू करण्यात आलेले आहे

सदर रिंगरोड च्या बांधकामात ८४५ चाळ रहिवाशी बाधित होत आहेत या चाळ रहिवासीयांनी खाजगी जमीन मालकाकडून व विकासकाकडून ७ ते १०लाख रुपयामध्ये करारनामा करून हजारो रूम राहिवासीयांनी विकत घेतलेले आहे हे सर्व रहिवासी १०ते१५वर्षांपासून सदर ठिकाणी राहत आहेत

कल्याण डोंबिवली महानगर पालिका रहिवासीयांचे पुनर्वसन करण्याच्या कामाकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष करत आहे या संदर्भात गेल्या ३ वर्षापासून पुनर्वसनाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून रिपब्लिकन पक्षाच्या अधिपत्याखाली संघर्ष करीत आहे

के डी एम सि व एम एम आर डी ए आणि जिल्ह्याधिकारी या अधिकाऱ्यांची मीटिंग बोलावून चाळ राहिवासियावर होत असलेला अन्याय दूर करून लवकरच त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या व चाळ रहिवासीयांच्या शिष्टमंडळाला दिले आहे शिष्टमंडळाने शासकीय सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मंत्री मोहदयाची रिपब्लिकन चे राष्ट्रीय सचिव दयाल बहादूरे, जालिंदर बर्वे, सुवर्णाताई पाटील, महेश वरेकर, प्रदीप सुपे, व इतर मान्यवरांनी भेट घेऊन निवेदन दिले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close