ताज्या घडामोडी

जमियत उलमा ए हिंद मनमाड तर्फे नांदगाव शहरातील पूरग्रस्तांना मदत, पूरग्रस्तांना ब्लँकेट व चादरी वाटप,*

*जमियत उलमा ए हिंद मनमाड तर्फे नांदगाव शहरातील पूरग्रस्तांना मदत, पूरग्रस्तांना ब्लँकेट व चादरी वाटप,*

प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.

लेंडी व शाकंबरी नदीला पुर आल्याने नांदगाव शहरात खुपमोठ्या प्रमाणे नुकसान झाले आहे, गावातील दुकाने हे मालासहीत वाहून गेली तर ,पुरामुळे नागरिकांचे घरे देखील वाहून गेली आहे,ही बातमी समजताच एका क्षणाचाही विलंब न करता जमियत उलमा ए हिंद मनमाड तर्फे रात्रीच्या वेळीच तात्काळ नांदगाव येथे जाऊन पूरग्रस्त बांधवांना मदत म्हणून टेम्पो भर ब्लँकेट व चादरी वाटप करण्यात आले,

लोकांसमोर हे एक भयानक संकट निर्माण झाले आहे, या भयावह परस्तीतीत सामाजीकबांधिलकी जोपासत जमियत उलमा ए हिंद रात्री वेळी नांदगाव शहरात दाखल होऊन रिलीफ कार्यकेले आहे,

जमियत उलमा ए हिंद मनमाड टीम तर्फे नांदगाव पूरग्रस्त भागांची पाहणी देखील करण्यात आली,भविष्यात पूरग्रस्त लोकांचे पुनवर्सन व्हावे यावर देखील जमियत उलमा ए हिंद कार्य करणार आहे,

संकटग्रसतांना मदत हा खरा धर्म, मानव सेवा ही खरी सेवा, आणि ही सेवा देण्याचा कार्य हे नेहमी
जमियत उलमा ए हिंद तर्फे करण्यात येते,या वेळी जमियत उलमा हिंद मनमाड शहराध्यक्ष हाजी रफिक साहब, उपाध्यक्ष फिरोज शेख,
मौलाना तौसिफ,शहर सचिव कादिर शेख, सह सचिव जुबेर हाजी साहब,खजिनदार कयाम सैय्यद,
उपस्तीत होते,
या मदत कार्यात हाशिम मर्चंड साहेब
(बब्लु भाई नाँव्हेल्टी मेडिकल वाले), व डॉ फरीद साहेब यांचे नांदगावकरांना मोलाचे सहकार्य लाभले,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close