ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यातील गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे बिरोळे गावचा संपर्क तुटला

निफाड तालुका ब्युरो चिफ राहुल वैराळ

  नांदगाव तालुक्यातील गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे बिरोळे गावचा संपर्क तुटला असल्याची माहिती नांदगाव बाजार समितीचे संचालक भरत शेलार यांनी दिली न्यायडोंगरी पासून जवळच असलेल्या बिरोळे येथील लोकसंख्या बाराशेच्या जवळ असून दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे बिरोळे न्यायडोंगरी रस्त्यावरील नाल्यात असलेल्या फरशिला मोठे भगदाड पडल्याने फरशी वाहून गेली आहे त्यामुळे या गावातील लोकांना न्याय डोंगरी चा रस्ता आज दूसरा दिवस उजाडून नाही बंद आहे तर साकोरे मार्गाला निघण्यासाठी असलेल्या रस्त्यावरून जाण्यासाठी मन्याड नदी पार करावी लागते या नदीला जोरदार पाणी वाहू लागल्याने येथील फरशी खचली आहे त्यामुळे नांदगाव कडे येण्याचा मार्ग बंद झाला आहे तर गावात आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास या रुग्णांना दवाखान्यात पोहोचवायचं कसं असा प्रश्न तयार झाला असून प्रशासनातील कोणीही अधिकारी वृत्त लिहीपर्यंत या गावात पोहोचले नव्हते तर पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ऊस कांदा मका कापूस तूर व इतर पिकेही वाहून गेले आहे मन्याड नदीचे पाणी शेतात घुसल्याने हानी झाली आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन इतर गावांशी संपर्क सुरू करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे दोन दिवसापासून संपर्क तुटल्याने दळणवळण बंद झाले आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close