ताज्या घडामोडी

१५ लाखांचा अवैध गुटखा जप्त : ४ जणांवर फैजपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!*

*१५ लाखांचा अवैध गुटखा जप्त : ४ जणांवर फैजपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!*

ठळक मुद्दे

राज्यात बंदी असताना सर्वत्र ठिकाणी गुटख्याची सर्रास विक्री

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांकडून गुटखा असलेले वाहनांवर कारवाई

मोठ्याप्रमाणात गुटखा येतो कुठून त्याचा बोलवता धनी कोण?

यावल रावेर तालुक्यात वाटेल त्या ठिकाणी मिळतो गुटखा

सदरील गुटख्याचा वाहन “लखन” नामक व्यक्तीकडे येणार होता? अशी चर्चा लोकांमध्ये सुरू होती.
—————————————-

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहादा येथून वाहनात भरलेला गुटखा सावदा शहराकडे जात असताना फैजपूर पोलिसांकडून त्यावर कारवाई करत जवळपास १५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. असून त्याच वेळी अरबाज खान नवाज खान पठाण व शेख जमीलोद्दीन रफियोद्दीन रा. शहादा जिल्हा नंदुरबार या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध फैजपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फैजपुर अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ दि.७ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी महिंद्रा पिकप वाहन क्र.(एम एच ४६ ई ६१२५) ची तपासणी केल्यानंतर त्यात १५ लाख ७० हजार ८०० लोकांच्या आरोग्यास धोकादायक गुटखा मिळून आला. याप्रकरणी संशयित आरोपी अरबाज खान नवाज खान पठाण व शेख जमीलोद्दीन रफियोद्दीन रा. शहादा जिल्हा नंदुरबार, साहिल रफिक मेमन रा. शहादा, व मोहसीन शेख रा. आडावद यांच्याविरुद्ध हवलदार राजेश बुऱ्हाटे यांनी फिर्याद दिल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुटखा व वाहनासह १९ लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला.

सदरची कौतुकास्पद कामगिरी सहा.पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवलदार देविदास सूरदास, राजेश बुऱ्हाटे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास उपनिरीक्षक मोहन लोखंडे, कॉन्स्टेबल महेंद्रा महाजन, केतन महाजन, होमगार्ड इंगळे हे करीत आहेत.

“सदरील वाहन सावदा – फैजपूर येथेच आला असावा तसेच हा गुटखा भरलेला वाहन एका “लखन” नामक व्यक्तीकडे येणार होता? परंतु सदरील वाहन येथे पोहोचण्या आधीच रस्त्यात फैजपूर पोलिसांनी थांबवले व चौकशी केली त्यात विमल गुटखा मिळून आला सबब त्यास पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले व कारवाई केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती.तर हा “लखन कोण?” या दिशेने पुढील तपास सुध्दा झाल्यास गुटखा माफिया कोण हा गहन प्रश्न सुटतील.”

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close