ताज्या घडामोडी

तहसिलदारांची रिक्त पदे भरणेसाठी बसपाच्या वतीने सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन*

*

पोलिस टाईम्स न्युज*
प्रतिनिधी. गौतम कांबळे. मुचंडी जत
सांगली जिल्हा प्रमुख.विजय तिकोटी सर

 

तहसिलदारांची रिक्त पदे भरणेसाठी बसपाच्या वतीने सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन*

जत व संख येथील 15 ते 20 दिवसांपासून तहसिलदारांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे जत शहरातील व तालुक्यातील लोकांची गैरसोय होत असून शेतकऱ्यांना व जनतेला नाहक त्रास सोसावा लागत आहे.

जत व संख येथील तहसिल कार्यालयांमधील सर्व कामे ठप्प झाली आहेत. तहसिलदार हे तालुक्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीमध्ये जनतेची कोणतीही कामे होत नाहीत. जत तालुक्याचे आमदार, सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांवर चिकलफेक करण्यातच मग्न आहेत. त्यांना जत शहराच्या व तालुक्यातील जनतेच्या अडचणी व विकासाचे काहीही देणेघेणे नाही असे दिसते.

तरी लवकरात लवकर जत व संख येथील रिक्त असलेली तहसिलदार पदांची नेमणूक करावी अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोमवार दि. 13/09/2021 पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी निवेदन देताना जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, विधानसभा महासचिव शरद शिवशरण, शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे, महेश कांबळे, शहर महासचिव दिपक कांबळे व शहराध्यक्ष सुनिल क्यातन उपस्थित होते.

*पोलिस टाईम्स न्युज*
प्रतिनिधी. गौतम कांबळे. मुचंडी जत
सांगली जिल्हा प्रमुख.विजय तिकोटी सर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close