आरोग्य व शिक्षण

कोविडग्रस्तांचा आधारवड अजित कुळधर व विनोद पाटील*

कोविडग्रस्तांचा आधारवड अजित कुळधर व विनोद पाटील*!

*कोविडग्रस्तांचा आधारवड अजित कुळधर व विनोद पाटील*

नगरसुल येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील व औषध निर्माता अजित कुळधर याच्या आधारामुळे कोरोनाकाळात रुग्णाच्या मदतीला धावून जात मानसिक आधार अन आरोग्य सेवाही देणाऱ्या या सेवकांची सेवा बघून कोविड सेंटर सोडतांना कोविडग्रस्त व त्यांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाल्याशिवाय राहत नाहीत..!

त्यांचे मुख्य काम हे कोविड ग्रस्ताला आधार देण्याचेच असते.तुमच्या घरात हि व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे,पण घाबरू नका आम्ही व्यवस्थितपणे उपचार करतोय..तुम्ही त्रास होत असेल तर तपासणी करून घ्या,या गोळ्याही घ्या,एकमेकांच्या संपर्कात राहू नका आणि कधीही अर्ध्या रात्री मदत लागली तर मला फोन करा….असे वाक्य येवला तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या अनेक कुटुंबीयांनी ऐकले आहे.अडीअडचणीला मोठ्या भावाप्रमाणे म्हणून मदत मिळाल्यावर जेव्हा हे संकट टळते तेव्हा आभार मानताना नक्कीच डोळ्यातून अश्रू अनावर होतात….असा अनुभव येवला तालुक्यातील जनता घेत आहे.आणि हे घडतंय विनोद पाटील व अजित कुळधर यांच्या अफलातून सेवाभावी कार्यातून..
आनंदाचे अनेक भागीदार असतात पण दुखात मात्र सोबती मिळणेही कठीण…हा अनुभव कोरोनाच्या महामारीत अनेक जणांनी घेतलाय. मात्र येथील नगरसुल ग्रामीण रुग्णालयातील अजित कुळधर नावाचे हे व्यक्तिमत्त्व व सामाजिक कार्यकर्ता विनोद पाटील मात्र स्वतःहून
कोरोणाग्रस्तांच्या सेवेसाठी पुढे येत आहेत.खरे तर नगरसुल ग्रामीण रुग्णालयात औषध निर्माण अधिकारी पदावर कार्यरत असल्याने त्यांची औषधांचे वितरणाची जबाबदारी..! पण चार भिंतीच्या आत अडकून न पडता मा.अजित कुलधर व विनोद पाटील यांनी स्वतःला रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सेवेत वाहून घेतले आहे.कोरोनाने विळखा घातलेल्या कुटुंबियांच्या जवळ शेजारीपाजारी तर सोडा नातलगही जवळ येत नाही…अशा स्थितीत विनोद पाटील व अजित कुळधर या कुटुंबियांना मानसिक आधार देऊन आरोग्य सेवेची जबाबदारी घेतात.बाभुळगाव येथील कोरोना केंद्रावर लाळेचे नमुने घेणे,त्यासाठी पाठपुरावा करणे,रुग्णाच्या जेवणाची सोय करणे त्यांना पाणी बॉक्स पुरवणे ही कामे तर ते करतातच पण इतर वेळेत नातेवाईक व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करणे,त्यांना मानसिक आधार देणे,त्यांच्या मनातील भीती दूर करणे आणि गरज असल्यास त्यांना घरी जाऊन गोळ्या-औषध उपलब्ध करून देणे ही सर्व कामे विनोद पाटील व अजित कुळधर हे विनासायास पार पाडत आहेत.
गेल्या पाच-सहा महिन्यापासून त्यांनी हे सेवाव्रत हाती घेतले असून अडचणीच्या काळात विनोद पाटील व अजित कुळधर मोठा आधारवड ठरत असल्याने आजाराच्या संकटातून बाहेर पडलेले कुटुंब त्यांचे आभार मानताना नक्कीच डोळ्यातून अश्रू तरळतात…एक-दोन नव्हे तर अनेक रुग्ण व नातेवाईक बोलतांना भावनिक होऊन डोळे पाणावल्याचे प्रसंग तर नित्याचेच.नगरसुल ग्रामीण रुग्णालय,नगरसूल परिसर व तालुक्यातुन नगरसुल सेंटर मध्ये येणारे सर्व कोविड बाधित रुग्ण त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी असलेला एकमेव आधार म्हणजे अजित कुळधर व विनोद पाटील.. कधीही कोणाचा फोन येऊ काही अडचण येऊ नाही हा शब्दच नाही त्यांच्याकडे… सर काहीतरी करतो त्यांना मानसिक आधार देऊन त्यांचं कौन्सिलिंग करून त्यांच्यासाठी असलेले आधारवड म्हणजे विनोद पाटील व अजित कुळधर…. कोणीही कधीही फोन करा किती फोन करा कधीच जे करणार नाही किंवा कधी पुन्हा पुन्हा फोन करतो म्हणून उलटून तर बोलणार नाही.. रुग्ण बरा झाल्यावर रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना पुन्हा मानसिक बळ देण्याचे काम आजही विनोद पाटील व अजित कुळधर करत आहे.नगरसुल covid-19 सेंटर येथील पाण्याची व्यवस्था असो,जेवणाची व्यवस्था असो,किंवा ऑक्सीजन सिलेंडर भरणे कामी दररोजचा अहवाल तहसीलदार साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी साहेब,प्रांत अधिकारी साहेब सिविल सर्जन,मुख्याधिकारी मॅडम,त्यांना वेळच्यावेळी फोन करणे हे कार्य विनोद पाटील व अजित कुळधर करत असतात.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जितेंद्र गायकवाड, डॉ

 

 

 

 

 

 

 

सूर्यवंशी,कोविड नोडल ऑफिसर तथा

 

 

 

 

अधीक्षक नगरसूल, डॉ जितेंद्र डोंगरे… MD मानसोपचार तज्ज्ञ,डॉ मदनुरे,यांच्यासह सर्व नगरसुल आरोग्य कर्मचारी रुग्ण सेवा देत आहेच.त्यांचे कौतुक होतच आहे परंतु यांच्या मदतीने विनोद पाटील व अजित कुळधर यांनी केलेल्या कामाचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहेच त्यांच्या मदतीमुळे कित्येक लोकांचे प्राण वाचवण्यात या अवलिया सेवकांना यश आले आहे.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close