ताज्या घडामोडी

बैलपोळा’* . *’कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.’*

*’बैलपोळा’* .
*’कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.’*
पोलिस टाईम्स न्यूज

हजारो वर्षांपासून शेतात शेतकऱ्यांसाठी राब-राब राबणाऱ्या बैलाचा सण म्हणजे बैलपोळा. जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजाचा खरा सारथी,मित्र,सखा,सोबती,सहकारी म्हणजे त्याचा सर्जा-राजा.
*आजच्या या सणाच्या दिवशी आपले सर्व शेतकरी या सर्जा-राजाला अंघोळ घालतात, झुल,घंटी,घुंगरू,फुलमाळा, फुगे,रंगांनी नटवून सजवून पुरणपोळीचा गोड नैवद्य खाऊ घालून त्याच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतात.*
आणि पुन्हा पुढील वर्षभर आपल्या बैलाच्या साथीने कष्ट करून शेतात सोनं उगवण्याची हिम्मत व प्रेरणा घेऊन अभिमानानं वाटचाल करतात.
*सर्जा-राजाच्या अविरत परिश्रमाला व विश्वाच्या या पोषणकर्त्या बळीराजाच्या कष्टाला, घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या पिकाला योग्य दाम मिळो हीच या दिवशी एक आशा,,,!!*
*”इडा पिडा टळू दे , बळीराजाचे राज्य येवू दे…!”*
(फलक रेखाटन- देव हिरे ) कलाशिक्षक, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close