ताज्या घडामोडी

.नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे ओबीसी समाजासाठी देशपातळीवर काम करत आहे म्हणून किरीट सोमय्या वैफल्यग्रस्त झाले आहे.

भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील बहुजनांच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी किरीट सोमय्या नावाच्या व्यक्तीला निवडले आहे‌.
भारताच्या बहुजन समाजाने मोठ्या एकजुटीने सर्वच पक्षांमध्ये बहुजन नेते निर्माण केले.
आणि भारतीय जनता पार्टी चा इतिहास आहे की भाजपामध्ये असलेल्या बहुजन नेत्यांनाही भाजपने संपवण्याचे कारस्थानी केले,
व इतर पक्षांमध्ये असलेल्या बहुजन नेत्यांना किरीट सोमय्या यांसारख्या दलालांना पुढे करून बदनाम करण्याचा कट भाजपच्या वतीने आखण्यात येतो.
भाजपच्या मूठभर नेतेच सर्वोच्च पदी असले पाहिजे अशी भाजपचे मिशन आहे भाजप बहुजन समाजाचे वापर फक्त मतांसाठीच करते.
परंतु महाराष्ट्राच्या बहुजन समाजाने वेळोवेळी भाजपच्या या मानसिकतेला उधळून लावले आहे.
आणि त्याच मुळे भाजप वेळोवेळी किरीट सोमय्या सारख्या दलालांना पुढे करून बहुजन नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करण्यासाठी सोडते.
परंतु महाराष्ट्र आता किरीट सोमय्या यांसारख्या दलालांना भीक घालत नाही.

भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर व गलीच्छ करण्याचे प्रयत्न केले आहे. भाजपच्या या नितीचा आम्ही निषेध करतो..

नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे ओबीसी समाजासाठी देशपातळीवर काम करत आहे म्हणून किरीट सोमय्या वैफल्यग्रस्त झाले आहे.

सोहेल मोमीन
ऊपजिल्हाध्यक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस,नाशिक

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close