ताज्या घडामोडी

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शहाबाज दीवकर यांच्यावर झालेल्या झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून तीन तारखेला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालय आयुक्त उपायुक्त यांना देण्यात आले राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सघां तर्फे निवेदन हल्लेखोरांवरती होवी कडक कारवाई

प्रतिनिधी पोलिस टाईम्स
सोमनाथ मानकर सप्तक्षुगी गड

राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष यांच्यावर अज्ञात गुंडांनी अचानक प्राणघातक भ्याड हल्ला केला यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि.२९ रोजी सायंकाळी पत्रकार शहाबाज दिवकर हे कसारा रेल्वे स्टेशन परिसरात फोनवरती बोलत असताना त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात गुंडांनी मागील बाजूने येऊन डोक्यात दारूची बाटली मारली. धारदार हत्याराने त्यांच्यावर वार करत असतांनाच त्यांचा वार चुकवून दिवकर यांनी तेथून पळ काढला. पळत जाऊन त्यांनी कसारा रेल्वे पोलिस स्टेशन गाठले.
कसारा रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली मात्र तेथील उपस्थित असलेले कर्मचारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. आपल्यावरती हल्ला झाला ती आमची हद्द नाही तरी आपण दुसऱ्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा अशी टोलवाटोलवी केली.

गुन्हा कुठेही घडला तरी तो दाखल करून संबधीत पोलीस ठाण्यात वर्ग करणे गरजेचे असते मात्र रेल्वे पोलिसांनी पत्रकार दिवकर यांना धुडकावून लावले याबाबत राज्यभर संताप व्यक्त होत आहे.

त्यानंतर ठाणे जिल्हाध्यक्ष दिवाकर यांनी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सघाचे अध्यक्ष संतोष निकम सर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तेथील स्थानिक पोलिस प्रशासनाशी फोन वरती बोलणे झाल्यानंतर दोषी वरची कडक कारवाई करावी अशी मागणी केली

दि 3/ रोजी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गाधीगिरी आदोलन करण्यात आले पदाधिकारी यांना एकत्र करून जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी यानी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गुंडा वरती कडक कारवाई करण्याकरता आंदोलनाचा भडगा उभारण्यात आलेला आहे

संबधीत पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यानी गुन्हा दाखल करुन नाही घेतला म्हणून यांच्यावर कारवाई करावी व अज्ञात गुंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणी साठी शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबरला राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालया समोर राज्यस्तरीय गांधीगिरी आंदोलन करण्यात आले .
तसेच या ठिकाणी आलेले पिंपळगाव चे आमदार दिलीप काका बनकर यांनीसुद्धा पत्रकारांच्या अडीअडचणी मध्ये मदत करण्यासाठी कायमच सहभागी असेल तसेच मी सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा नक्कीच मंत्रालयात करेल असे सांगितले

उपजिल्हाधिकारी दतात्रय नडे पो अधिकक्षक सचिन पाटील उपआयुक्त चौगुले मॅडम व इतरही कार्यालयात निवेदन देण्यात आले .

  • राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष निकम सर रुपेश वराडे योगेश घोलप इमरान शहा सोमनाथ मानकर महेश साळुंखे दत्तात्रय दरेकर कैलास उपाध्ये रहिम शेख राहुल वैराळ हेमंत घावठे सचिन गोरडे देविदास निकम प्रकाश निकम ईरफान पठाण देविदास निकम जुबेर शेख समाजकार्य सघ कोठावळे सर (पुणा) व ज्ञानेश्वर जगदाने सर (नादगाव)
    इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close