ताज्या घडामोडी

त्या वळण रस्त्याचे काम अखेर पुन्हा नव्याने सुरू : पोलीस टाईम न्युजच्या बातमीची दखल*

*त्या वळण रस्त्याचे काम अखेर पुन्हा नव्याने सुरू : पोलीस टाईम न्युजच्या बातमीची दखल*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पालिकेच्या हद्दीत पंजाब नॅशनल बँक व पीर मंजनशाहा दर्गा समोरील रस्त्याच्या वळण कोपरा मोठा करण्याचा काम पालिकेने सुमारे दहा लाख रुपये खर्च करून केले होते. मात्र सदर वळण रस्त्याचे काम सुरु असतांना पालिकेतील बांधकाम विभागाचे अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी त्यावेळी याकडे लक्ष न दिल्यामुळे ठेकेदारांनी मनमानी करून वळण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले होते. याबाबत”सावद्यात पीर मंजनशाहा दर्गा व पंजाब बँक जवळ नवीन वळण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे”या मथळ्याखाली पोलीस टाईम न्युज यांनी सविस्तर बातमी प्रकाशित केली होती.

म्हणूनच यामुळे नेहमी दर्जेदार कामा साठी ख्याती असलेल्या सावदा पालिकेची या कामा मुळे शहरात चर्चा सुद्धा होत होती.
सदर निकृष्ट कामाचे वृत्त प्रकशित झाल्याने यांची दखल घेत पालिकने सदर ठकेदारास हे काम पुन्हा करण्या बाबत सूचना केल्या त्या नुसार ह्या वळण रस्त्याचे काम पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले असून येथील नागरिकातुन समाधान व्यक्त होत आहे. मात्र सदरील काम आता तरी दर्जेदार उत्कृष्ट टिकाऊ व्हावे अशी अपेक्षा देखिक या सोबत व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close