ताज्या घडामोडी

नाशिक: महाराष्ट्र कोंकण पूरग्रस्त प्रभावित बांधव यांना प्रथम चरण मध्ये मदत सामग्री वितरण

पोलीस टाईम न्युज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290

नाशिक: महाराष्ट्र कोंकण पूरग्रस्त प्रभावित बांधव यांना प्रथम चरण मध्ये मदत सामग्री वितरण नंतर दिनांक २८ आणि २९ ऑगस्ट रोजी द्वितीय चरण मध्ये *दिंडोरी पॅटर्न आणि रेड ब्रिगेड* टिम ने महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील बीड़वाड़ी खरवली महाड़, तलोसी महाड़ और साखर गोवेले सुतार वाड़ी, पोलादपुर च्या स्थानीय पूरग्रस्तांना मदत सामग्री (नोट बुक, कम्पास, फाइल, पेन, इत्यादि), किराणा सामग्री (आटा, तांदूळ, मसाला, बिस्किट, इत्यादि) रोजच्या वापराचे कपडे वाटप. या वेळेस पूरग्रस्त यांना मदत थेट घरोघरी जाऊन करण्यात आली जेणेकरून मदत योग्य व गरजू लोकांना मिळावी. तत्पश्चात *दिंडोरी पॅटर्न आणि रेड ब्रिगेड टीम* ने स्थानीय लोकांबरोबर चर्चा करून त्यांचे झालेले नुकसान व त्याबदल्यात शासनाकडून मिळणारी मदत याबाबत माहिती घेतली. प्रत्येक्ष घटना स्थळावर जाऊन पहिले असता विदारक द्रुश्य दिसले *दिंडोरी पॅटर्न संस्था व सरकारी योजना यांच्या माध्यमातून शक्य ती मदत करण्याबाबत आश्वस्त केले*.
देशवासी समाज बांधव यांना विनंती आहे कि पूरग्रस्त प्रभावित यांना जास्तीत जास्त मदत करावी. कारण अजूनहि काही पूरग्रस्त प्रभावित ठिकाणी मदत पोहचली नाही आहे. आणि ते मदतीची वात पाहत आहे. दरड कोसळून आलेल्या पुरामुळे घरांमध्ये अडकून पडझड झाल्यामुळे जखमी झालेले कोंकण बांधव मुंबई च्या जे जे हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे. त्यातील बहुतांशी लोकांची घरे पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे. त्यांना मदत होणे नितांत आवश्यक आहे.
राजेंद्र भालेराव (संचालक दिंडोरी पॅटर्न) आणि अनिल विश्वकर्मा (संथापक और सचिव रेड ब्रिगेड) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मदतकार्य *दिंडोरी पॅटर्न चे सदस्य दिलीपजी पेंढारी, दत्तात्रेयजी खैरनार, किरणजी सुतार, राजेंद्र सोनवणे तथा रेड ब्रिगेड संस्था सदस्य व श्री राकेश विश्वकर्मा, श्री संतलाल विश्वकर्मा, श्री दिनेश विश्वकर्मा, डॉ. के के विश्वकर्मा, श्री चंद्रशेखर विश्वकर्मा (वी.सी.ओ.आई सदस्य, नाशिक)* यांच्या बहुमुल्य सहकार्याने पुर्ण करण्यात आले.त्याबद्दल दिंडोरी पॅटर्न आणि रेड ब्रिगेड शतशः आभारी आहे.
संस्था विशेष करून सौ. प्रभा सुतार, श्री महेश धोंडू सुतार, श्री भरत लक्ष्मण चिंचघकर, श्री रुपेश सुतार, श्री रघुनाथ तांबुटकर, श्री कमलेश सुतार, श्री गणेश सुतार, श्री कृष्णा सुतार, श्री पांडुरंग सुतार (सरपंच), श्री प्रकाश सुतार यांचे आभारी आहे ज्यांनी मदत सामग्री वाटप करण्यासाठी बहुमुल्य मार्गदर्शन व सहकार्य केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close