आपला जिल्हा

माथेरानच्या ग्यास टेम्पो साठी मुदत वाढ मिळावी भवितव्य मुंबई उच्च न्यायालया च्या हाती ,

सनियंत्रण समितीची शिफारस निर्णया कडे लक्ष, टेम्पो ची मुदत दि 30 सप्टेंबर रोजी मुदत संपत आहे

माथेरानच्या ग्यास टेम्पो साठी मुदत वाढ मिळावी

भवितव्य मुंबई उच्च न्यायालया च्या हाती ,

सनियंत्रण समितीची शिफारस निर्णया कडे लक्ष,

टेम्पो ची मुदत दि 30 सप्टेंबर रोजी मुदत संपत आहे

चंद्रकांत सुतार–माथेरान

लॉकडाऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माथेरानच्या नागरिकांना जीवणावश्य वस्तू मूळ किंमतीत मिळाव्या या साठी माजी आमदार सुरेशभाऊ लाड व माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात मालवाहतुकी साठी टेम्पोला परवानगी द्यावी या साठी याचिका दाखल केली होती हाय कोर्टाने मानवतेच्या दृष्टीने दि 30 सप्टेंबर पर्यंत टेम्पोला मुदत दिली होती कोर्टाने मोनिटरिंग कमिटीला दि 15 सप्टेंबर रोजी टेम्पो वाहतुक नागरिकांना किती फायदेशीर ठरते या बाबत अहवाल कोर्टात सादर करण्यास सांगितले होते . नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी उत्तम नियंत्रण ठेवल्याने टेम्पोचा गैरवापर होऊ शकला नाही.
ग्यास टाकी राहिवश्यना मूळ किमतीत मिळाल्याने रु 100 ते 150 पर्यंतची बचत झाली नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी त्यावेळी सांगितल्या प्रमाणे नगरपालिके कडून अतिरिक्त वाहतूक खर्च रु 35 एका टाकी मागे दिल्याने राहिवश्यना मोठा दिलासा मिळाला.
टेम्पो साठी दोन वर्षे मुदत वाढ मिळावी यासाठी ऍड गौरव पारकर कोर्टात अर्ज दाखल करणार आहेत लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी कोरोनाचा परिस्थिती गंभीर झाली आहे केंद्रीय पर्यावरण खात्याने ग्यास वाहतुकी साठी ई टेम्पोचा वापर करण्याची सुचना केली आहे मात्र या साठी क्ले पेव्हर ब्लॉक चा रोड होणे आवश्यक आहे एमएमआरडीए ठेकेदाराने ई टेम्पोचा प्रयोग करून पाहिला परंतु चढणीवर चढत नाही त्यामुळेच रस्ता होणे आवश्यक आहे.
घोड्यांवरून ग्यास टाकी वाहतुकीस प्राणी मित्र संघटनांचा विरोध आहे ग्यास सारखे ज्वलनशिर पदार्थ घोड्यांवरून वाहतूक बेकायदेशीर असल्याचे कुंजू सुब्रमण्यम यांनी जिल्हाधिकारी यांना
पत्र दिले आहे
अजय सावंत व सुनिल शिंदे यांनी सनियंत्रण समितीला पत्र लिहून टेम्पो ला दोन वरश्याच्या मुदत वाढी साठी हाय कोर्टास शिफारस करण्याची मागणी केली आहे माथेरानचे विविध राजकीय पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व मनसेने तसेच महिलांच्या तर्फे माथेरान महिला समाजाने पत्र देऊन टेम्पोला मुदत वाढ मिळावी या साठी मागणी केली आहे.आता माथेरानच्या ग्यास टेम्पो चे भवितव्य मुंबई उच्च न्यायालया च्या हाती , सनियंत्रण समितीची शिफारस महत्वाची आहे, दि 30 सप्टेंबर रोजी मुदत संपत आहे
मुदत वाढी साठी कोर्टात अर्ज दाखल केल्यावर उच्य न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्व माथेरान कारांचे लक्ष लागले आहे,
—————————————-
गेस टेंपो वाहतुकीमुळे गेस टाकी mrp रेट मधेच मिळत होती त्या मुळे लॉक डाऊन काळात गेस टाकीवरील अतिरिक्त खर्च वाचत होता, आता गेस टेंपो वाहतुकीस मुदत संपत असली तरी सद्या लॉक डाऊन ची परिस्थिती आजही असल्याने गेस टेम्पो वाहतुकीस किमान 2 वर्षाची मुदत वाढ मिळावी अशी आमची मागणी आहे
सुनील शिंदें — सामाजिक कार्यकर्ते
—————————————-
पूर्वी गेस टाकी घोड्यावरून वाहतूक होत असल्याने 150 ते 200 रु जास्त द्यावे लागत होते कोरोना काळात गेस टेम्पो वाहतूकस परवानगी दिल्याने आम्हाला गेस टाकी मूळ किंमतीत व वेळेत मिळत होते, परंतु आता 30 सप्टेंबर पर्यंतच गेस टेंपो वाहतुकीस परवानगी असल्याने पुन्हा गेस टाक्या घोड्यावरून आणल्यास अतिरिक्त खर्च वाढणार आहे, तरी सर्व गृहिणीच्या वतीने शासनाला विनंती करतो की गेस टेंपो वाहतुकीस मुदत वाढ द्यावी
—————————————-
राजश्री शैलेंद्र दळवी–गृहिणी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close