ताज्या घडामोडी

*राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत हजर असल्यामुळे नगराध्यक्षा अनिता येवले यांना भाजपा कडून कारणे दाखवा नोटीस* सावदा प्रतिनिधी फरीद शेख

*राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत हजर असल्यामुळे नगराध्यक्षा अनिता येवले यांना भाजपा कडून कारणे दाखवा नोटीस*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे सन २०१६ -२०२१ या पंचवार्षिक नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी करून कमळ या चिन्हावर निवडून आलेल्या नगराध्यक्षा अनिता पंकज येवले हे दि.१४ ऑगस्ट २०२१ रोजी सावद्यात राष्ट्रवादी पक्षाकडून घेण्यात आलेली आढावा बैठकीत हजर हजर राहिले होते. म्हणून यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे.

सदरची कारणे दाखवा नोटीस नगराध्यक्षा अनिता येवले यांना भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या सूचनेनुसार भाजपचे रावेर तालुका अध्यक्ष राजन भरत लासुरकर यांच्या सहीने दि. ३१ ऑगस्ट रोजी दिलेली असून त्यात असे म्हटले आहे की नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसाच्या आत नगराध्यक्षा अनिता येवले यांनी आपला खुलासा सादर करावा. खुलासा सादर न केल्यास त्यांचे काहीएक म्हणणे नाही असे गृहीत धरून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल कळावे असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे.

तसेच नगराध्यक्षांसह कमळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या व राष्ट्रवादीच्या घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत हजर असलेले नगरसेवकांना सुद्धा कारणे दाखवा भारतीय जनता पक्ष कडून नोटिसा बजावण्यात आले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close