ताज्या घडामोडी

गणेशोत्सव : या महामार्गावर खड्डे बुजवणार तर गर्दी टाळण्यासाठी पालिकेचे ‘स्लॉट बुकिंग’…..

गणेशोत्सव : या महामार्गावर खड्डे बुजवणार तर गर्दी टाळण्यासाठी पालिकेचे ‘स्लॉट बुकिंग’…..

प्रतिनिधी :- प्रतिक मयेकर

गणपती उत्सवानिमित्त कोकणात रस्तेमार्गाने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी मुंबई ते गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत. तसेच गणेशोत्सव काळात पाच दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. खालापूर टोल नाक्याजवळ, पेण, वडखळजवळ आणि पुई पुलाजवळही मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत.

मुंबई ते गोवा महामार्गाची खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना रुग्णसंख्या कमी आहे तसेच निर्बंधही शिथिल झाले आहेत. त्यामुळे कोकणात एसटी, खासगी बस आणि चार चाकी वाहनाने जाणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई ते गोवा महामार्गावर ८ ते १० सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबरला अवजड वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, याशिवाय नागोठणे, इंदापूर, महाड मार्ग, कशेडी घाटातही खड्डे असून चिपळूणजवळ चार पदरी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे वाहतुकीला याचा फटका बसणार आहे.

गर्दी टाळण्यासाठी पालिकेची आयडिया

गणेशोत्सवात विसर्जन सोहळ्यामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिका ‘स्लॉट बुकिंग’ सुविधा सुरू करणारे.. यानुसार विसर्जनासाठी वेळ मिळाल्यानंतर, तासाभरात भाविकांना अपेक्षित ठिकाणी बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नेता येणार आहे. यासाठी पालिका एक सॉफ्टवेअर तयार करत आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून गाड्या

गणेशोत्सवानिमित्त भोसरी, दिघी, कळस, विश्रांतवाडी, येरवडा ठिकाणाहून अनेक जण ग्रुप बुकिंग करत आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ४४ प्रवाश्यांच्या ग्रुपसाठी जादा गाड्यांची सोय केली आहे. ६ ते ९ सप्टेंबरला ३४ गाड्या प्रवाशांसाठी वल्लभनगर आगारातून कोकण मार्गाकडे धावणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close