ताज्या घडामोडी

anc— सन 2019 च्या जुलै- ऑगस्ट महिन्यामध्ये महापुराच्या वेळी आरोग्य विभागाला वेळोवेळी मदत करणाऱ्या पत्रकारांचा तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव

किरण मस्कर-कोल्हापूर

anc— सन 2019 च्या जुलै- ऑगस्ट महिन्यामध्ये महापुराच्या वेळी आरोग्य विभागाला वेळोवेळी मदत करणाऱ्या पत्रकारांचा तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला..

vio— पन्हाळा तालुक्यातील कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राला सण 2019 ला आलेल्या महापुराच्या वेळेत आरोग्य विभागाला मदत करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पोलिस टाईम्स चे प्रतिनिधी किरण मस्कर, कोतोली जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुणाल चव्हाण, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा व राजकीय सामाजिक व अन्य पत्रकारांचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच कोतोली गावचे सरपंच प्रकाश पाटील, पत्रकार व अन्य सामाजिक कार्यकर्ते यांचाही गौरव करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर कुणाल चव्हाण यांनी यावेळी दिली.या कार्यक्रमाला पत्रकार शिवाजी पाटील. शशि शेठे. डॉक्टर सायली सूर्यवंशी. डॉक्टर लेविस. आरोग्य सहाय्यक श्रीमती गाडगीळ यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते…

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close