ताज्या घडामोडी

पुरणगाव येथे श्रावण रायभान ठोंबरे व सोपान बाबुराव गाडे यांच्या गाय गोठयांचे भूमिपूजन

येवला तालुका ब्युरो चिफ रहीम शेख

पुरणगाव येथे श्रावण रायभान ठोंबरे व सोपान बाबुराव गाडे यांच्या गाय गोठयांचे भूमिपूजन पंचायत समितीचे सभापती प्रवीणभाऊ गायकवाड यांचे हस्ते पार पडले यावेळी आपल्या भाषणात सभापती यांनी गावासह तालुक्यातील जनतेने पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तालुक्यात आजवर ७५० गाय गोठयांचा लाभ दिला असून कुठल्याही माहीती,अडचण,शंका असल्यास थेट पंचायत समितीशी संपर्क साधावा नवीन कृती आराखडा बनविणे चालू असून जास्तीत जास्त जनतेने नाव नोंदणी करावी प्रमुख पाहुणे डॉ सुरेश कांबळे,प्रहार चे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, किरण चरमळ,सरपंच मंदाकिनी नानासाहेब ठोंबरे ग्रामसेवक पुरी मँडाम ऊपसरपंच रामनाथ ठोंबरे,ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र ठोंबरे,श्रावण ठोंबरे,कल्पना ठोंबरे,रोजगार सेवक रहीम शेख,बापू ठोंबरे,शिवाजी खापरे,बापू थेटे, माधव ठोंबरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close