राजकीय

सनी यादव याची भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड करावी – युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले याची मागणी

खालापूर - समाधान दिसले

सनी यादव याची भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड करावी – युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले याची मागणी

खालापूर – समाधान दिसले


खालापूर तालुक्यात भाजपाची ताकद दिवसेंदिवस अधिकच वाढू लागल्याने भाजपाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रेरीत होत आहेत. भाजप पक्ष खालापूर मजबूत करण्यासाठी निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करताना दिसत असून काही दिवसापूर्वीच भाजपाचे विदयमान तालुकाध्यक्ष मोरेश्वर उर्फ बापू घारे याना कोरोना विषाणूने घेरल्याने त्याच्या उपचारा दरम्यान निधन झाले. त्याच्या निधनाचे भाजपा खालापूरने एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. बापू घारेच्या निधनानंतर रिक्त असलेल्या तालुकाध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चित असली तरी निष्ठावंत, सर्व क्षेत्रातील ज्ञान असलेले तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे खंदे समर्थक सनी यादव यांच्या नावाला अधिक पसंती निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून मिळू लागली आहे. निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मागणीचे समर्थन उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जगदीशभाई आगिवले यांनी करीत सनी यादव याची खालापूर तालुका अध्यक्षपदी निवड करा अशी मागणी जगदीश आगिवले यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टीला रायगड जिल्ह्यात सध्या सुगीचे दिवस आले असल्याने विविध पक्षातील बड्याबड्या नेत्यांची इनकमिंग सुरू असून अनेक नेते भाजपात प्रवेश करीत आहेत. संघटनेला बळ देण्यासाठी झटत असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात संधी दिली जात असून खालापूर तालुक्यात भाजपा तालुकाध्यक्ष बापू घारे यांनी प्रामाणिक व निष्ठावंतपणे काम केल्याने त्याच्यावर दुसऱ्यांदा तालुकाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली होती. परंतु काही दिवसापूर्वी मोरेश्वर उर्फ बापू घारे यांचे कोरोना आजारामुळे निधन झाल्याने खालापूर तालुक्यातील भाजपाचा एक मजबूत खांब कोसळल्याने भाजपा कार्यकर्ते मोठ्या दुखात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर रिक्त असलेल्या खालापूर तालुकाध्यक्ष पदासाठी असंख्य नावे चर्चित असली तरी सध्या सर्व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सनी यादव यांच्या नावाला पसंती मिळु लागली आहे.
तर सनी यादव यांनी खालापूर तालुक्यातील भाजपा पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केला असल्याने त्यांच्या कामाचा अनुभव आणि पक्ष बळकटीसाठीची तळमळ लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी यादव यांची भाजपा खालापूर तालुकाध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासुन निष्ठावंत पदाधिकारी आहेत.
याबाबत युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष जगदीशभाई आगिवले यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, यादव याचा सर्व क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव आणि सर्वाना आदराने वागणूक देण्याचा स्वभाव नक्कीच पक्ष वाढी हिताचे ठरले त्यामुळे वरीष्ठ पक्षश्रेष्ठी यादव याची खालापूर तालुकाध्यक्षपदी निवड करावी जेणेकरून तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत बनेल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close