ताज्या घडामोडी

राज्यात आंतरजिल्हा प्रवास बंदी नसल्याने कोकणात गणेशोत्सव मध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठीची आरटीपीसीआर चाचणी अट रद्द करा -सुहास खंडागळे*

*राज्यात आंतरजिल्हा प्रवास बंदी नसल्याने कोकणात गणेशोत्सव मध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठीची आरटीपीसीआर चाचणी अट रद्द करा -सुहास खंडागळे*

⭕ *गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी*

रत्नागिरी:-राज्यात आंतरजिल्हा प्रवास बंदी अथवा जिल्हाबंदी नसताना,कोकणातच गणेशोत्सव मध्ये जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चाकरमान्यांना घातलेली आरटीपीसीआर चाचणी अट रद्द करावी अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ईमेल मध्ये खंडागळे यांनी म्हटले आहे की,सध्या राज्यात जनतेला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करताना बंधने नाहीत.जिल्हाबंदी देखील नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्ग प्रशासनाने जाहीर केल्यानुसार गणेशोत्सव दरम्यान चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. जिल्हाबंदी नसताना व राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी बंधने नसताना कोकणातच गणेशोत्सव मध्ये लागू करण्यात आलेली आरटीपीसीआर चाचणीची अट रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा असे या पत्रात म्हटले आहे.

जिल्हाबंदी असताना नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना जी बंधने तेव्हा होती ती आता नाहीत याकडे खंडागळे यांनी लक्ष वेधले आहे.अलीकडे कोकणात महापूर आला तेव्हा आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी हजारो कोकणवासीय मुंबईतून कोकणात गेले, तेव्हा चाचण्या केल्या गेल्या नाहीत,अलीकडे राजकिय पक्षांच्या मोठ्या यात्रा निघाल्या तेव्हा चाचण्या केल्या नाहीत मग सामान्य माणूस गणपतीला गावाला निघाला की त्याच्यावर नियम बंधने का?ही लोकांची भावना आहे.आणि हा कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न आहे असेही सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

आजच्या घडीला रस्तेमार्गे महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात RTPCR चाचणी न करता नागरिकांचा संचार, प्रवास सुरु आहे.राज्यातील नागरिक शासनाच्या सूचनांचे पालन करून योग्य ती काळजी घेऊन आंतरजिल्हा प्रवास करत आहेत.राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी अन्य ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केल्याची माहिती नाही,मात्र असे असताना कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रशासनाने गणेश उत्सव मध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठी असा नियम जाहीर केला आहे.दोन डोस घेतलेल्या नागरिकांच्या व्यतिरिक्त नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे गरजेचे आहे.आपण गणेशभक्तांची अडचण लक्षात घेऊन कोणतेही लक्षण नसणाऱ्या नागरिकांना प्रवासाची मुभा देण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला द्यावी.आरटीपीसीआर चाचणी अट रद्द करावी अशी मागणी खंडागळे यांनी या पत्रात केली आहे.

शासनाकडे लस उपलब्ध नसल्याने अनेक जण लस घेऊ शकले नाहीत तर अनेकांचा दुसरा डोस अद्याप झालेला नाही. नागरिकांनी आगाऊ प्रवास तिकीट बुक केलेले आहे.शिवाय कोकणात गणपतीला गावाला जाणारा माणूस गाडीत बसला की तो थेट त्याच्या गावात,वाडीत घरी जाणार आहे,राजकीय पक्षांसारखे मोर्चे, यात्रा काढून तो गर्दी करत नाही.मुंबईतून सुटणाऱ्या गाड्या थेट गावात जाणार असल्याने गर्दीचा प्रश्न नाही.कोकणातील गणेश भक्तांची श्रद्धा आणि प्रवासातील अडचण लक्षात घेऊन आपण योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती खंडागळे यांनी केली आहे.

ज्या पद्धतीने सध्या राज्यातील नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास/संचार करता येत आहे त्याच पद्धतीने हवं तर अधिक खबरदारी घेऊन कोकण वासीयांना रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यास परवानगी मिळावी,चाकरमान्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close