ताज्या घडामोडी

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा येवला म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेकडून निषेध व निवेदन

उच्च पदस्त अधिकारी जर सुरक्षित नस्तिल तर सर्व सामान्य जनतेचं काय? सुरक्षा यंञना वर प्रश्न चिन्ह ...पोलिस टाईम्स

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा येवला म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेकडून निषेध व निवेदन

दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिपळे, माजिवाडा प्रभाग या अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असतांना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले व अमरजित यादव यांनी त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हात्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे याचा येवला म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेकडून निषेध करण्यात आला व तहसील व नगरपरिषद येथे निवेदन देण्यात आले
सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंगळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पूर्णपने तुटून रस्त्या उजव्या हाताला हि गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या डोक्या खोल मार लागला आहे. अंगरक्षक. सोमनाथ पालवे यांच्या डाव्या हाताचे एकबोट पूर्णपणे तुटून पडले झालेला प्रकार आतिशय गंभीर असून
एका महिला अधिकार्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे हे नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून या बाबीचे सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे.असेही निवेदनात नमूद केले आहे
त्यामुळे संघटनेच्या वतीने ह्या गीन्हेगारी कृत्याचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी देखील केली
हल्लेखोरांवर कठोर कारवाई अटक केलेल्या गुन्हेगारांवर शीघ्र गतीने खटला चालून कायद्या नुसार
कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर अध्यक्ष शाम लोंढे,सरचिटणीस तुषार लोणारी, खजिनदार विजय झाल्टे ,उपाध्यक्ष केशव विवाल, संघटक धनराज ढिकले,रुपेश तेजी आदींच्या सह्या आहेत यावेळी शेकडो कर्मचारी उपस्तीत होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close