ताज्या घडामोडी

10000 मच्छी बिज येवला अंगुलगाव येथील अहिल्याबाई होळकर पाझर तलावात सोडले-सभापती प्रविण गायकवाड,येवला पंचायत समिति

10000 मच्छी बिज येवला अंगुलगाव येथील अहिल्याबाई होळकर पाझर तलावात सोडले याप्रसंगी येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड येवल्याचे उद्योजक मच्छिंद्र काका पवार यांच्या हस्ते हैदराबाद येथून आणलेल्या मत्स्यबीज पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोडण्यात आले या प्रसंगी गावचे सरपंच बाजीराव जाधव अंकुश शिरसाट अविनाश जगताप सोपान जगताप परमानंद जाधव पुंजाराम गायकवाड शिवाजी गायकवाड पोलीस पाटील समाधान झाल्टे पंकज जाधव विजय मोरे रमेश सोनवणे खरवंडी चे सरपंच मोरे जगन उपस्थित होते आदिवासी बांधवांना रोजगार
मीळावा व त्या आपल्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतर होऊ नये यासाठी सभापती प्रवीण गायकवाड यांनी गेल्या नऊ वर्षापासून येवला तालुक्यातील 14 पाझर मच्छ बीज टाकण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे त्यामुळे आदिवासी बांधवांना व नवीन तरुणांना रोजगार निर्मितीचे साधन हक्काचा तयार झालेला आहे या व्यवसायामुळे आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण स्थलांतरामुळे होत नव्हता परंतु स्थलांतर थांबल्यामुळे त्यांना जागेवरच शिक्षण मिळत आहे असे सभापती प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले येवला तालुक्याचे उद्योजक मच्छिंद्र काका पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंगुलगाव येते मत्स्यबीज सोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close