ताज्या घडामोडी

भारताचा गौरवशाली इतिहास न्याय, मानवता व त्यागाचा*-मा. चारुदत्त आफळे

मनोहर देसले [[पिंपळगाव बसवंत] यास कडून... मोहाडी ता.२७:

*भारताचा गौरवशाली इतिहास न्याय, मानवता व त्यागाचा  *—  मा. चारुदत्त आफळे

मनोहर देसले [[पिंपळगाव बसवंत] यास कडून…
मोहाडी ता.२७:

भारत जगातला असा देश आहे ज्या देशाला गौरवशाली अशा इतिहासाची परंपरा आहे. चाणक्य, सम्राट अशोक,राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज,बाजीराव पेशवा या सर्व इतिहास विरांच्या गाथा आपल्याला देशप्रेमाची प्रेरणा देतात. आज ते देशप्रेम कुठेतरी हरवत चालले आहे. म्हणून इतिहासाच्या अभ्यासकांनी इतिहासाची खरी ओळख तरुण पिढीला करून दिली पाहिजे.पराभूत मानसिकता कधीही इतिहास घडवू शकत नाही. वैचारिक जिवंतपणा, जाज्वल्यता, बाणेदार वृत्ती आणि ईश्वरनिष्ठा अशा चार व्यक्ती वैशिष्ट्यांनी जिजाबाईचे व्यक्तिमत्व होते म्हणून छत्रपती शिवाजी नावाचा युगपुरुष तयार होतो.असे प्रतिपादन चारूदत्त आफळे( पुणे) यांनी केले. ते मोहाडी( ता. दिंडोरी) येथील श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्ताने अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन च्या वतीने आयोजित ६५ व्या ऑनलाइन व्याख्यानमालेत चौथे व पाचवे पुष्प गौरवशाली भारताचा इतिहास व वर्तमान या विषयावर गुंफताना बोलत होते. पुढे बोलताना आफळे म्हणाले इतिहास वाचताना खूप वेळा विरोधाभास आढळून येतो. भारताचा 30 टक्के भुभाग ज्याने पहिला नव्हता त्या सिकंदराला आपण इतिहासात जगजेता म्हणतो हे चुकीचे आहे.इतिहासाचे अवलोकन इतिहासाच्या अभ्यासकांनी करतांना सामाजिक अखंडता भंग पावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.इतिहासाचा वापर सामाजिक उत्थाणासाठी केला जातो की सामाजिक स्तर निर्माण करण्यासाठी केला जातो यावर इतिहासाचे संवर्धन अवलंबून असतें. सकारात्मक इतिहास पुन्हा पुन्हा उगाळला तर चालेल पण नकारात्मक इतिहास जर पुन्हा पुन्हा उगाळला तर सामाजिक एकोपा आणि शांतता धोक्यात येते. आज समाजात खूप स्तर निर्माण झाले आहेत. सामाजिक असहिष्णूता देखील पूर्वीपेक्षा अधिक वाढलेली दिसते. याला कारण इतिहासाचे नकारात्मक चित्रणावर अधिक भर दिला असं वाटतं.
कार्यक्रमास
दत्तात्रेय कुलकर्णी गणपतीपुळे,
मुख्याध्यापक मोजड,डाॅ.फरीदा खान,
डॉ. जयश्री जाधव कदम, ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव, प्रवीण डिंगोरे,
प्रा. समृद्धी चेपे
डॉ. सोनल बैरागी,
नितीन शिवदे सह ग्रामस्थ ऑनलाईन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य विलास देशमुख, सूत्रसंचालन वैशाली मोरे तर आभार धनंजय देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश जाधव ,राजेंद्र शिंपी, मिलिंद देशमुख, निखिल जाधव, नानासाहेब जाधव, सागर पाटील, सुनील जाधव यांनी प्रयत्न केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close