ताज्या घडामोडी

*श्री नेमीनाथ जैन विद्यालयात समूहगीत गायन स्पर्धा संपन्न*

*श्री नेमीनाथ जैन विद्यालयात समूहगीत गायन स्पर्धा संपन्न*

चांदवड तालुका प्रतिनिधी/ सुनिलआण्णा सोनवणे

श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त समूहगीत गायन स्पर्धा संपन्न झाली.

75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा विद्यालयात प्राचार्य डॉक्टर सौ संगीता बाफना यांनी आयोजित करण्यात आली.

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गीत जयोस्तुते,प्रथम क्रमांक ऐ मेरे वतन के लोगो, द्वितीय क्रमांक देश रंगीला, तृतीय क्रमांक सारे जहाँ से अच्छा या गीतांनी बक्षीस पटकाविले.

या कार्यक्रमात श्री अतिष मुंदडा, श्री युसुफ अन्सारी, श्री विजय माथा हे परीक्षक म्हणून लाभले. देशभक्तीपर समूहगीत गायनाच्या या स्पर्धेचे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन विद्यालयाच्या संगीत विभाग प्रमुख सौ संगीता चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन श्री शिवदास शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री आर एम पवार, आर एस पाटील, डी.व्ही. ठाकरे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close