ताज्या घडामोडी

मागासवर्गीय लोकांचा विकास होण्यासाठी* *समाजकल्याणचे सर्व महामंडळाचे त्वरित सुविधा उपलब्ध व्हाव्यात*

पोलिस टाईम्स न्युज* प्रतिनिधी. गौतम कांबळे मुचंडी जत सांगली जिल्हा प्रमुख. विजय तिकोटी सर

*मागासवर्गीय लोकांचा विकास होण्यासाठी*
*समाजकल्याणचे सर्व महामंडळाचे त्वरित सुविधा उपलब्ध व्हाव्यात*

*महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून मागासवर्गीय लोकांच्यावर अन्याय…………… महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे सरकार आले पासून कोरोना या महामारीने लोकांचे जगणे मुश्किल केले आहे लोकांच्या हाताला काम नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय लोकांचा विकास व्हावा म्हणून मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे आणि या महामंडळाकडून एन एस एफ डी सी द्वारे काही मागासवर्गीय लोकांनी कर्ज प्रकरणे मंजूर करून घेतली आहेत पण त्या मंजूर झालेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला नाही यासाठी समाजकल्याण विभाग कडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही दिड ते दोन वर्ष पुर्ण झाली तरी अद्याप कोणालाही कर्ज पूरवठा केला नाही तसेच मागासवर्गीय लोकांना घर देणेसाठी रमाई घरकुल आवास योजना ही कार्यान्वित करण्यात आली आहे आणि या योजनेतून जत तालुक्यातील अनेक मागासवर्गीय लोकांना घर मंजूर झाली होती पण त्या मंजूर झालेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला नाही आणि त्याचे बिल जमा झाले नाही म्हणून समाजकल्याण अधिकारी यांना विचारले असता ते जिल्हा परिषद घरकुल विभागाचे नाव सांगून मोकळे होतात आणि जिल्हा परिषद घरकुल विभागाचे अधिकारी यांना विचारले असता ते म्हणतात की तुमची आॅफलाईन मंजूरी मिळाली आहे अजून ऑनलाईन मंजुरी मिळाली नाही ऑनलाईन मंजुरी मिळाली की तुमची बिले जमा होतील असे म्हणतात या ऑनलाईन ऑफलाइन च्या खेळात मागासवर्गी लोकांचा हक्कनाक बळी जातो आणि तालुक्यातील अनेक मागासवर्गीय लोक घरापासून वंचित राहावे लागत आहे तरी या प्रकरणांची चौकशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि समाज कल्याण मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांनी लक्ष घालून त्या प्रकरणाची चौकशी करून मागासवर्गीय लोकांना न्याय द्यावा आणि ति रक्कम जमा व्हावी यासाठी मा औटे साहेब प्रांतिधिकारी जत यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर मूस्लिम आघाडी अध्यक्ष शब्बीर नदाफ युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष नारायण कामत उपाध्यक्ष इरापा केंगार उपाध्यक्ष राहुल चंदनशिवे इत्यादी कार्यकर्ते हजर होते*

*पोलिस टाईम्स न्युज*
प्रतिनिधी. गौतम कांबळे मुचंडी जत
सांगली जिल्हा प्रमुख. विजय तिकोटी सर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close