ताज्या घडामोडी

शिवसैनिक | छगन भुजबळ – खांदे मजबूत असतील तर, आव्हाने पेलली जाऊ शकतात,मग पाऊल ही आपोआप संघर्ष करू लागतात !

All rights are © reserved

शिवसैनिक | छगन भुजबळ

– खांदे मजबूत असतील तर, आव्हाने पेलली जाऊ शकतात,मग पाऊल ही आपोआप संघर्ष करू लागतात !

१९९० च्या दशकातील छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या कारकिर्दीवर प्रामुख्याने कटाक्ष टाकला तर,एक अभिनय कुशल अशी वकृत्वाची देणगी लाभलेल्या व घणाघाती शैलीची जोड प्राप्त झालेल्या व्यक्तीचं रणझुंजार नेतृत्व डोळ्यासमोर उभं राहतं.

– जेव्हा शिवसेनेला आपली संघटना मुंबई,पुणे,ठाणे या तीन महानगरांच्या मर्यादेपलीकडे वाढवावी वाटली,तेव्हा संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेना वाढवण्याची जबाबदारी स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळ साहेब यांच्या वर टाकली; आणि महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात शिवसेना छगन भुजबळ यांनी नेवून पोहोचवली,मागास वर्गीय कुटूंबातील घटकाला सत्तेची पदे देऊन शिवसेनेनं त्यांच्यातील राजकीय महत्वाकांक्षेचा अंगार फुलवण्याचे काम केले.

१९९२ मध्ये जेव्हा विधान सभेच्या निवडणूका झाल्या त्या वेळी शिवसेनेचे ५२ आमदार विजयी झाले होते,जो विदर्भ आणि मराठवाडा काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्याला भली मोठी खिंडार पाडण्याचे काम साहेब यांनी आपल्या राजकीय डावपेचातून त्या वेळी केले होते; सामान्य कार्यकर्ताची फळी भुजबळ साहेब यांनी उभी केली आणि त्यांना राजकारणात विजयी देखिल केले; संपूर्ण महाराष्ट्रात ओ.बी.सी मतदारांची शिवसेना साहेब यांनी उभी केली; ही किमया करणारे साहेब तेव्हाचे आणि आजचे एकमेव शिवसैनिक.

१९९० च्या विधान सभेच्या काळात आणि त्या आधीच्या काळात छगन भुजबळ यांनी संपुर्ण महाराष्ट्रात झंझावती दौरे करून त्या वेळेस जवळ पास ५०० हून अधिक सभा घेण्याचा रेकॉर्ड केला होता; शिवसेना प्रमुखांच्या खालोखाल जर कुणाच्या सभांना गर्दी जमत असेल तर ती फक्त छगन भुजबळ यांच्या सभांना !

– साहेब यांची अचाट स्मरण शक्ती,संघटन कौशल्य,सर्वच थरातील लोकांत मिसळण्याची लोकविलक्षण वृत्ती,तळागाळातील लोकांना महत्वकांक्षी विचारांनी प्रेरित करण्याची धमक ह्याचं संघटन कौशल्यच्या बळावर साहेब प्रत्येक कसोटीत खरे उतरले.

– भुजबळ रुपी बावनकशी सोने ह्या काळात झळाळून उठले,संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षाचे जाळे विणनारा हा कार्यकर्ता पुढे एक झंझावात झाला.

– साहेब; यांच्या भूतकाळात जेव्हा कार्यकर्ते रमत असतील तेव्हा नक्कीच ह्या लोकनेत्याच्या झुंजार खेळीने प्रेरित होत असतील, म्हणूनच ही व्यक्ती नाही चळवळ छगन भुजबळ; छगन भुजबळ ही घोषणा इथे आवर्जून उल्लेख करावी वाटते.

– लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मांडतांना कधी शासनाच्या भूमिकेत तर कधी शासनाच्या विरोधात प्रभावी पणाने साहेब यांनी प्रश्न मांडले आहे, विधीमंडळा तील विविध आयुधांचा वापर सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कसा असावा हे साहेब यांनी त्यांच्या कामकाजातून दाखवून दिले आहे; नगरसेवक,महापौर,शिवसेनेचे एकमेव आमदार,महसूल मंत्री,गृहनिर्माण मंत्री,विरोधी पक्षनेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री,उपमुख्यमंत्री आणि आत्ता अन्न नागरी पुरवठा मंत्री अशा विविध पदांवर काम करतांना त्या पदाला न्याय दिला त्या कामाचे प्रतिबिंब म्हणजे साहेब यांचा निर्भय… एक प्रवास.

– साहेब यांची ही कारकीर्द आमच्या सारख्या नवं तरुणांना,नवोदित आमदार,खासदार लोकप्रतिनिधी,अभ्यासक,राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरत आहे.

– सामान्य माणूस सुद्धा आपल्या असामान्य कामगिरीतून समाज्यात आणि राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो याचं उदाहरण साहेब यांनी घालून दिलंय; आज त्यांचा हाच इतक्या मोठ्या उंचीचा अविरत प्रवास लिहतांना अभिमान वाटतो.

✍️✍️
डॉ.कमलेश पैठणकर
भुजबळ समर्थक

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close