ताज्या घडामोडी

प्रशासन अधिकारी यांनी विहित मुदतीत काम न केल्यास भ्रष्टाचार निर्मूलन जनहित संरक्षण संघर्ष कृती समितीतर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देऊन मा. प्रांत अधिकारी यांना निवेदन दाखल

दैनिक पोलीस टाईम* तालुका प्रतिनिधी / शांताराम घुले

प्रशासन अधिकारी यांनी विहित मुदतीत काम न केल्यास भ्रष्टाचार निर्मूलन जनहित संरक्षण संघर्ष कृती समितीतर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देऊन मा. प्रांत अधिकारी यांना निवेदन दाखल

*दैनिक पोलीस टाईम*
तालुका प्रतिनिधी / शांताराम घुले

नाशिक (चांदवड)/२४ ऑगस्ट सविस्तर वृत्त – आर के मामा यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार विरोधी जन हित संरक्षण संघर्ष कृती समिती तयार करण्यात आलेली असून या समितीतर्फे मा. प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख साहेब ,मा.तहसीलदार प्रदीप पाटील साहेब तसेच इतर सर्व प्रशासकीय संबंधित कार्यालयांना निवेदन दाखल करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांनी कोणत्याही कार्यालयात त्यांना आवश्यक असलेल्या माहितीबाबत अर्ज दाखल केल्यास किंवा वादग्रस्त दाव्याच्या संदर्भात न्याय मागणी केल्यास असे न्याय मागणी अर्ज माहिती मागणारे अर्ज याबाबतीत अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी विहित मुदतीत कामकाज करावे अशा स्वरूपाची मागणी केलेली असून मुदतीत कामकाज न केल्यास संबंधितांवर सोबत जोडलेल्या शासन निर्णय परीपत्रकाप्रमाणे कठोर स्वरूपाची कार्यवाही करावी कार्यवाही न केल्यास वेळप्रसंगी जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे. भ्रष्टाचार कृती समितीचे नियोजित अध्यक्ष आर के मामा समवेत सचिव शहाजी ठाकरे, सदस्य हौशीराम गुंजाळ, समाधान आहेर व इतर तालुक्यातील सर्व सन्मानिय सदस्य उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close