आपला जिल्हा

राजकारणापलिकडे जाऊन सामाजिक बांधलकी जपणारे नेतृत्व पनवेल पंचायत समिती सदस्य तनुजाताई संजयराव टेंबे

खालापूर प्रतीनीधी - समाधान दिसले

राजकारणापलिकडे जाऊन सामाजिक बांधलकी जपणारे नेतृत्व पनवेल पंचायत समिती सदस्य तनुजाताई संजयराव टेंबे

भारतीय जनता पार्टीच्या पनवेल पंचायत समिती सदस्या, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा तथा पनवेल तालुका शिक्षण समिती सदस्या तनुजाताई संजय टेंबे यांनी
राजकारणात येण्याची कधी स्वप्न देखील पाहिले नव्हती, पण आज त्या पंचायत समितीच्या सदस्या पदावर विराजमान आहेत. त्यांचा प्रवास हा खुप खडतर म्हणावचं लागेल
तनुजाताई आपटे ग्राम पंचायत निवडणूकीत विजय संपादन आणि पहिल्या त्या कोणता ही पक्षा सोबत नसताना त्या अपक्ष निवडणूक निवडून आल्या. समाजाची बांधिलकी असल्याने त्या अहोरात्र गावाच्या विकासासाठी प्रयत्न करु लागल्या, काही दिवसात त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. आणि त्यानंतर सौ. तनुजाताई यांचा खरा मोठा व्यापक राजकीय प्रवास चालू झाला.
उरण आमदार महेशशेठ बालदी साहेब यांच्या नेतृत्वाने तसेच भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांतदादा ठाकुर यांच्या पनवेलच्या विकास कामांवर प्रेरित होऊन तनुजाताईंनी भाजपामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर तनुजाताई आणि खऱ्या अर्थाने ताईंच्या मागे सदैव खंबीरपणे उभे असलेले एक शांत स्वभावाचे मितभाषी अभ्यासू व्यक्तिमत्व ताईंचे पती अँड संजयजी टेंबे साहेब यांची पनवेल तालुका भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली.
त्यानंतर सौ. तनुजाताई आणि अँड.संजय दादा समाजाची बांधिलकी असल्यामुळे निस्वार्थ जनतेची सेवा करू लागले. काही कालावधीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लागल्या तनुजाताई यांचा बरोबर वाढता असलेला जनसमुदाय बघून आमदार महेशशेठ बालदी व आमदार प्रशांतदाद ठाकुर यांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास टाकून आपटा पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी अपेक्षा केली. गेली कित्येक वर्षे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ह्या भागात तनुजाताईंना पराभव समोर दिसत असताना हि ताईंनी हसत मुखाने पराभवाला न डगमगता उमेदवारी स्विकारली त्यानंतर प्रचाराला कमी वेळ होता. तरी पण प्रत्येक घरोघरीं जाऊन ताईंनी प्रचाराला सुरुवात केली. गेल्या 45 वर्षाचा इतिहास मोडीत काढून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असलेल्या आपटा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तनुजाताईंनी भरघोस मतांची आघाडी घेऊन भारतीय जनता पक्षाच्या आपटा पंचायत समितीच्या पहिल्या सदस्या म्हणून निवडून येत भाजपाचा झेंडा डौलाने फडकला.
तर पंचायत समिती सदस्या झाल्यावर त्यांनी कधी कोणावर अन्याय होऊ दिला नाही. अनेकदा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तनुजाताई पंचायत समितीमध्ये आक्रमक देखील झाल्या. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड निर्माण झाल्यानंतर ताईंनी आपटा पंचायत समिती विभागात अनेक विकास कामे केली. तरुण-तरूणीनां अनेक रोजगार मिळवून दिले. आपटा पंचायत समितीमध्ये अनेक समाज आहेत, प्रत्येक समाजाची केलेली कामे व मदत करण्याच्या पद्धतीमुळे सर्व समाजाच्या वतीने ताईंचे कौतुक होत आहे.
तर आज पूर्ण देश कोरोनाशी युद्ध लढतोय. याकाळात तनुजाताई घरी बसून राहिल्या नाहीत. भर पावसात नदी-नाले भरले असताना तनुजाताई आदिवासी वाड्यांच्या डोंगराळ भागात जाऊन तेथील आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या, आदिवाशी बांधवांना कोरोनामुळे मोलमजुरी नसताना खाण्या पिण्याचे काही अडचणी आहे का याची स्वतः जाऊन चाचपणी सुरू केली. तनुजाताईंनी प्रत्येक शासकीय योजना माझा गरीब आदिवासी बांधवांच्या विकासासाठी कशी पोहचली पाहिजे यासाठी प्रयत्न केले.
अशा महिला लोकप्रतिनिधीच्या कार्याचा सर्वत्र कौतुक होत असुन पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा वर्षाव होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close