ताज्या घडामोडी

*थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकबाकी भरुन महावितरण कार्यालयास सहकार्य करावे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार

*थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकबाकी भरुन महावितरण कार्यालयास सहकार्य करावे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार*
====================

सांगोला / विकास गंगणे-

: मार्च अखेर ४१ ९ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी ट्रंसफार्मर चा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर तालुक्यातील राजकीय नेते मंडळींच्या पुढाकाराने थकबाकीदार वीजग्राहकांना मंगळवार पर्यंत मुदत देत , तोपर्यंत कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे .

थकबाकीदार वीज ग्राहकांनी येत्या मंगळवारपर्यंत थकबाकी भरून वीज कार्यालयास सहकार्य करावे , अन्यथा पुन्हा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु केली जाणार असल्याचा इशारा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी दिला आहे . सांगोला तालुक्यातील शेती पंप , घरगुती , औद्योगिक व व्यावसायिक आशा ५ ९ हजार ०२ विज ग्राहकांकडे मार्चअखेर ४१ ९ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी आहे . सदरच थकबाकी वसूल करण्यासाठी सांगोला महावितरण कार्यालयाकडून ट्रंसफार्मरचा वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती . दरम्यान विविध राजकीय पक्षाकडून ट्रंसफार्मर सुरू करून शेतकयांना व वीज ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती .

त्यानुसार काल शुक्रवार दि . २०रोजी महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी तालुक्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व नेतेमंडळींना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा घडवून आणली . सदर चर्चात्मक निर्णयानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तसेच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींच्या मागणीनुसार सांगोला तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत वेळेनुसार सुरू करण्यात आला . सांगोला महावितरण कार्यालयाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार तालुक्यात ३३ हजार ८०३ शेतीपंपाचे ग्राहक आहेत . यापैकी ३१ हजार ६६५ शेती पंप विज ग्राहकांकडे कृषी वीज धोरण २०२० नुसार माफीसह मार्च २०२१ अखेर ४१२ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे . तर घरगुती , औद्योगिक व व्यावसायिक असे एकूण ४२ हजार ५२० ग्राहक आहेत .

पैकी २७ हजार ३३७ विज ग्राहकांकडे ६ कोटी ६३ लाख रुपये थकबाकी आहे . असे एकुण शेती पंप , घरगुती , औद्योगिक व व्यावसायिक आशा ५ ९ हजार ०२ विज ग्राहकांकडे मार्चअखेर ४१ ९ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी आहे . सदरची थकबाकी वसूल करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार सांगोला महावितरण कार्यालयाकडून कारवाईची तीव्र राबवली जात आहे .

यामध्ये मार्च महिन्यातील कारवाई प्रमाणेच थकबाकी वसूल करण्यासाठी ठंसफार्मर चा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई राबवली जात आहे . वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाई मध्ये सांगोला तालुक्यातील बहुतांशी गावांमधील ट्रंसफार्मर चा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे . परिणामे शेतकन्यांमधून वीजपुरवठा सुरळीत सुरू राहावा अशी मागणी होत असताना , तालुक्यातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नेते मंडळींनी पुढाकार घेत , तर काही नेते मंडळींनी आक्रमक भूमिका घेत , थकबाकीदार वीजग्राहकांना विज बिल भरण्यासाठी मुदत द्यावी परंतु तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी लावून धरली होती .

शेतकन्यांच्या मागणीनुसार विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी केलेल्या मागणीवरून सांगोला उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून नेतेमंडळींची चर्चा घडवून आणली . सदर चर्चात्मक निर्णयानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तसेच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींच्या मागणीनुसार सांगोला तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत वेळेनुसार सुरू करण्यात आला

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close